गोवा लघुपट महोत्सवात पेनफुल प्राईड सर्वोत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:29 AM2020-12-15T04:29:31+5:302020-12-15T04:29:31+5:30
पुणे : यंदा पुण्यामध्ये झालेल्या सातव्या गोवा लघुपट महोत्सवात पुण्यातल्याच लघुपट दिग्दर्शक आणि कलाकारांनी महत्वाची पारितोषिके मिळवत बाजी मारली. ...
पुणे : यंदा पुण्यामध्ये झालेल्या सातव्या गोवा लघुपट महोत्सवात पुण्यातल्याच लघुपट दिग्दर्शक आणि कलाकारांनी महत्वाची पारितोषिके मिळवत बाजी मारली. यात ‘पेनफूल प्राईड’ सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला तर महेश लिमये यांना ‘पुनरागमनाय’ साठी आणि स्वप्निल कापुरे यांना ‘दोन जगातला कवी’ या लघुपटांसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले.
मराठी चित्रपट परिवारातर्फे आयोजित महोत्सवाचे ज्येष्ठ लेखक श्रीनिवास भणगे, सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ समीक्षक दिलीप कुकडे, ज्येष्ठ कॅमेरामन राम झोंड, भालचंद्र सुपेकर उपस्थित होते. महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचे दुसरे पारितोषिक ‘वाट्या’ला मिळाले जर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे दुसरे पारिताषिक सुशांत पांडे यांना मिळाले. पुनीत बालन स्टुडियोज ची निमिती असलेल्या ‘आशेची रोषणाई’ हा सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला. ‘लव्ह पॉईट’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट संकल्पनेचे पारितोषिक मिळाले. सर्वोत्कृष्ट प्रयोगशील लघुपटाचे पारितोषिक ‘कलावा’ लघुपटाने पटकाविले. चेन्नईतील ‘मधुरम’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट कॅमेरा, संकलन आणि पटकथेची पारितोषिके जिंकली. बंगलोर मधील ‘एक कप चहा’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटाचे पारितोषिक पटकाविले. तर मुदस्सर खान यांच्या लघुपटाने सर्वोत्कृष्ट सांगीतिक लघुपटाचा मान पटकाविला. शुभम खैरनार यांच्या ''''''''मंत्रा'''''''' लघुपटाने सर्वोत्कृष्ट जाहिरातीचे पारितोषिक पटकाविले. मोगरा लघुपटाला फिक्शन लघुपटाचे पारिताषिक तर ‘ठिणगी’ लघुपटाला लाईव्ह एक्शन लघुपटाचे बक्षिस मिळाले.
ज्योती देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. भालचंद्र सुपेकर यांनी आभार मानले.