तरूण लुटताहेत पॅराग्लायडिंगचा आनंद
By admin | Published: October 30, 2014 11:41 PM2014-10-30T23:41:39+5:302014-10-30T23:41:39+5:30
येथील ऐतिहासिक शिंदे टेकडी येथे दिवाळी सुटीनिमित्त साहसी पॅराग्लायडिंग खेळाचा विद्यार्थी व तरुण आनंद लुटत आहेत.
Next
वडगाव मावळ : येथील ऐतिहासिक शिंदे टेकडी येथे दिवाळी सुटीनिमित्त साहसी पॅराग्लायडिंग खेळाचा विद्यार्थी व तरुण आनंद लुटत आहेत. हवेत पक्ष्याप्रमाणो विहार करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते पॅराग्लायडिंगचा आधार घेत आहेत.
पॅराग्लायडिंगमुळे मावळातील काही तरुणांना रोजगारही मिळाला आहे. तालुक्यात पॅराग्लायडिंग प्रशिक्षणासाठी येत असलेले परदेशी विद्यार्थी व तरुण आकर्षण ठरत असून, खेळ पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहे. पावसाळ्याचे वातावरण निवळल्याने पोषक वातावरणात शिंदे टेकडी व कामशेत येथे विद्यार्थी व तरुणांना प्रशिक्षण दिले जात आहे.
शिंदे टेकडी येथे इंग्लंड, युरोप, फ्रान्स, जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, हॉलंड या देशांसह भारतातील विद्यार्थी व तरुणही प्रशिक्षणाठी येत आहेत. या खेळास तालुक्यात 1995 या वर्षापासून झाली. सुरुवातीस स्थानिक युवकांचा सहभाग कमी होता. सध्या तालुक्यातील 1क्क् ते 125 तरुण प्रशिक्षक झाले असून, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचप्रमाणो अप्रशिक्षित युवकांनाही इतर कामातून रोजगार मिळतो.
एकटय़ाने पॅराग्लायडिंगच्या साहाय्याने आकाशात उड्डाण घेणो (सोलो फ्लाइंग), प्रशिक्षकासोबत दुस:या व्यक्तीला घेऊन आकाशात उड्डाण घेणो (टॅडम फ्लाइंग) अशा दोन प्रकारचे प्रशिक्षण घेतले जाते.
पॅराग्लायडिंगच्या स्पर्धा विविध देशांत घेतल्या जात असून, भारतात हिमाचल प्रदेशात दर वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये स्पर्धा घेण्यात येतात. ठरावीक अंतरावर पॅराग्लायडिंगच्या साहाय्याने उतरणो. आकाशात गिरक्या घेणो व ठरावीक जागेवर उतरणो या तीन प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतात.
तालुक्यात कार्यरत चार पॅराग्लायडिंग प्रशिक्षिण संस्थांत वायुदलाचे जवान प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. अनेक जण या खेळाचा अनुभव घेत आहेत, असे प्रशिक्षकांनी सांगितले. (वार्ताहर)
4प्रशिक्षक संजय पेंडुरकर म्हणाले, ‘‘कामशेत येथे कॉँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व भारतीय वायुदलाचे जवानांनी पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. सकाळी 7 ते 11:3क् र्पयत, तसेच पोषक वातावरण असल्यास दिवसभर प्रशिक्षण सुरू असते. वडगाव येथील शिंदे टेकडीवर पॅराग्लायडिंगचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येते. पायलट होण्याच्या अगोदर विद्यार्थी पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतात. हिमाचल प्रदेशात नोव्हेंबर 2क्15 मध्ये विश्वचषक होणार असल्याने स्पर्धक जोरदार तयारी करत आहेत.