डेक्कन क्विनच्या या डब्यात राेज म्हटली जाते अारती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 06:07 PM2018-10-11T18:07:59+5:302018-10-11T18:15:21+5:30

डेक्कन क्विनमधील पास धारकांच्या डब्यात राेज सकाळी अारती म्हंटली जाते. अापला प्रवास सुखकर व्हावा यासाठी गणरायाकडे प्रार्थना केली जाते.

passenger praise the god before starting a journy in deccan queen | डेक्कन क्विनच्या या डब्यात राेज म्हटली जाते अारती

डेक्कन क्विनच्या या डब्यात राेज म्हटली जाते अारती

Next

पुणे : प्रवासाला सुरुवात करताना अनेकदा गणपती बाप्पा माेरयाचा उद्घाेष केला जाताे. परंतु तुम्ही कधी एखादी ट्रेन स्टेशनवरुन सुटल्यानंतर सुरक्षित प्रवासाची मनाेकामना करत अारती म्हंटलेली पाहिलीये का. पुणे- मुंबईच्या प्रवाशांच्या जिव्हाळ्याची असणाऱ्या डेक्कन क्विनमधील पास धारकांच्या डब्ब्यामध्ये राेज अारती केली जाते. 

    नाेकरीसाठी मुंबईला पुण्यावरुन दरराेज अनेक लाेक प्रवास करत असतात. त्यांच्यासाठी पार धारकांचा डबा अारक्षित केलेला असताे. राेज सकाळी डेक्कन क्विन पुणे स्टेशनवरुन निघाल्यानंतर या डब्यामध्ये अारती म्हंटली जाते. अापला प्रवास विनाविघ्न पार पडाे यासाठी सर्व पास धारक उभे राहत ट्रेन ज्या दिशेने जात अाहे, त्या दिशेला उभे राहून अारती म्हणतात. अारती म्हणणे ही अाता एक परंपरा झाली असल्याचे या ट्रेनने दरराेज प्रवास करणारे गणेश वाघुले म्हणाले. तसेच ही अारती म्हणण्यासाठी काेणालाही बळजबरी केली जात नाही, प्रत्येकजण श्रद्धेने ही अारती करत असताे. अारती म्हणण्याची पद्धत काेणी सुरु केली याबद्दल माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. 

    इंग्रजांनी 1 जून 1930 राेजी डेक्कन क्विन सुरु केली. त्यानंतर अाजपर्यंत या दाेन्ही शहरांना जाेडण्याचे काम ती करत अाहे. दरराेज हजाराे प्रवासी या ट्रेनने प्रवास करत असतात. पुणे- मुंबई दरम्यान धावणारी ही सुपरफास्ट ट्रेन अाहे. दरवर्षी तिचा वाढदिवसही माेठ्या जाेमाने साजरा केला जाताे. दरराेज अारती म्हणण्याच्या पद्धतीमुळे या ट्रेनच्या वैशिष्ट्यात अाणखीनच भर पडली अाहे.

Web Title: passenger praise the god before starting a journy in deccan queen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.