भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये ४० प्रवाशांना विषबाधा, पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या उपचाराची व्यवस्था

By विवेक भुसे | Published: November 29, 2023 01:02 AM2023-11-29T01:02:46+5:302023-11-29T01:03:48+5:30

Pune News: चेन्नई हून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना विषबाधा झाली असल्याचे वृत्त असून या प्रवाशांच्या औषधोपचारासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे.

Passengers poisoned in Bharat Gaurav Yatra train, arrangement for treatment of passengers at Pune railway station | भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये ४० प्रवाशांना विषबाधा, पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या उपचाराची व्यवस्था

भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये ४० प्रवाशांना विषबाधा, पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या उपचाराची व्यवस्था

- विवेक भुसे
पुणे - चेन्नई हून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना विषबाधा झाली असल्याचे वृत्त असून या प्रवाशांच्या औषधोपचारासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ससून रुग्णालयात प्रवाशांच्या उपचारासाठी व्यवस्था करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जवळपास ४० प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.

भारत गौरव यात्रा रेल्वे चेन्नईहून पुण्याकडे येत होती़ रेल्वे गाड्यांमधील पेन्ट्री कार काढून टाकण्यात आल्या असल्या तरी या विशेष गाडीमध्ये खानपान सुविधा देण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या भारत गौरव यात्रा रेल्वेगाडीमध्ये काही प्रवाशांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे या प्रवाशांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही विशेष रेल्वे गाडी पुणे रेल्वे स्टेशनला आली. प्लॅटफॉर्मवरच विषबाधा झालेल्यांवर प्राथमिक उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. ससून रुग्णालय प्रशासनाला ४० बेड तयार ठेवण्यास सांगण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधील खानपान सुविधा, पेन्ट्री कार काढून टाकल्याने लोकांना ताजे अन्न मिळत नाही. अनेकदा सकाळचे फुड  पॅकेट हे सायंकाळी, रात्री देण्यात येते. त्यातून  अशा दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रेल्वेने पुन्हा पेन्ट्रीकार सुरु कराव्यात, असे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले.

Web Title: Passengers poisoned in Bharat Gaurav Yatra train, arrangement for treatment of passengers at Pune railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.