सध्या तेथे ९२ रुग्ण उपचार घेत असून या ठिकानी रुग्नांसाठी भजन, किर्तन, प्रवचन, योगा यांचे कार्यक्रम सातत्यांने घेतले जातात.
आमदाबाद गावचे युवा किर्तनकार नवनाथ महाराज माशेरे यांचे प्रवचन झाले यावेळेस घोडगंगा सहकारी साखर कारखाण्यांचे संचालक राजेंद्र गावडे, शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, शिरूर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सोनभाऊ मुसळे, वारकरी महामंडळाचे संचालक शिवाजी कांदळकर, दिंडी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष गावडे, डॉ स्वप्निल काळे, आरोग्य सेविका सुवर्णा थोपटे , प्रियांका लंके, निलम खेमनार, प्रिती गवई, रेश्मा काने, भरत पावरा , आकाश बोबले , नितीन खाडे उपस्थित होते.
माशेरे महाराज म्हणाले की, कोरोनो मुळे रुग्नांनी भयभित न होता आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहीजे तसेच डॉक्टर व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे हे रुग्णसेवेसाठी घेत असलेल्या कार्याचे कौतुक माशेरे महाराज यांनी केले .
स्वागत राजेंद्र गावडे यांनी तर आभार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सोनभाऊ मुसळे यांनी मानले .
--
१५टाकळी हाजी रुग्णसेवा हीच इशसेवा
टाकळी हाजी ता शिरूर येथे मळगंगा कोविड सेंटर मधे रुग्नसेवेसाठी प्रवचन करताना नवनाथ महाराज माशेरे ..