पादचारी मार्गाचे काम अपूर्ण, नागरिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:10 AM2021-03-16T04:10:27+5:302021-03-16T04:10:27+5:30
ताम्हाणे चौक येथील मेडिपॉइंट हॉस्पिटल औंधकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पादचारी मार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत ठेवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना नाइलाजाने ...
ताम्हाणे चौक येथील मेडिपॉइंट हॉस्पिटल औंधकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पादचारी मार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत ठेवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना नाइलाजाने रस्त्याच्या मधून चालावे लागते. वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे पादचारी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर या ठिकाणी अनेकदा किरकोळ अपघात देखील होत आहे.
अपूर्ण सोडण्यात आलेल्या पादचारी मार्गाच्या ठिकाणी अवैध रीतीने राडारोडा देखील टाकण्यात आला आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या पादचारी नागरिकांमुळे वाहनचालकांना देखील त्रास सहन करावा लागतो. पादचारी मार्गावरून अचानकपणे रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांमुळे वाहनचालकांचा गोंधळ निर्माण होतो.
परिसरामध्ये बाणेर बालेवाडी विधाते वस्ती परिसरातील ज्येष्ठ नागरिक सकाळी मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी येतात. रस्त्यावर टाकण्यात येणाऱ्या राडारोड्यामुळे देखील या परिसराला बकाल स्वरूप आले आहे.