पिंपरीत तरुणाची आत्महत्या ; आयटी कंपनीत करत होता काम 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 03:59 PM2019-07-22T15:59:53+5:302019-07-22T16:01:44+5:30

आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना पिंपरी येथे घडली. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली.

person get suicide in Pimpri ; Work in IT company | पिंपरीत तरुणाची आत्महत्या ; आयटी कंपनीत करत होता काम 

पिंपरीत तरुणाची आत्महत्या ; आयटी कंपनीत करत होता काम 

Next

पुणे : आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना पिंपरी येथे घडली. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. सचिन वांदेकर असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याचे वय २८ वर्ष होते. 

यापूर्वी तो विमाननगर येथील आयटी कंपनीत काम करत होता. मात्र तीन दिवसांपूर्वी त्याने तिथून राजीनामा दिला होता. तो लहान भाऊ दीपक शिवाजी वांडेकर आणि मित्र विशाल अशोक लहाने या मित्रासोबत पिंपळे गुरवला राहत होता. मागील तीन दिवसांपासून तो  नोकरी सोडल्याने रूमवरच होता. काल संध्याकाळी विशाल  बाहेरून आला आणि बाथरूममधून गेला. तर सचिनचा लहान भाऊ दीपक हा जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली जात होता. तेवढ्यात अचानक  गोळी झाडल्याचा आवाज आला. आवाज ऐकून दोघेही धावत आले. त्यावेळी  सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी त्याला तात्काळ औंध रूग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्याच्याकडे पिस्तूल कोठून आले याचा शोध पोलीस घेत असून आत्महत्या का केली याचीही चौकशी केली जात आहे. 

Web Title: person get suicide in Pimpri ; Work in IT company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.