पुणेकरांनो तुम्ही जर पॅावर किंवा स्पीड पेट्रोल भरत असाल तर आता तुम्हांला लिटर मागे शंभर रुपये मोजावे लागणार आहे.पुण्यानेही आता पेट्रोलच्या पेट्रोलची शंभरी गाठली आहे. इंधनांच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्यानंतर पुण्यात पेट्रलने शतक गाठले आहे.
गेल्या काही दिवसांपासूनच पेट्रोल डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहे. सरकार फक्त टॅक्स किंवा या किॅमती कमी करण्यासाठी काही करता येतंय का याची चाचपणी सुरु असल्याचे सांगत आहे. पण कोणत्ताही दिलासा मिळण्याची सध्या चिन्ह दिसत नाहीयेत. आता पुण्यातही पेट्रोलने शंभरी पार केलेली आहे.
आजच्या किंमती नुसार साधे पेट्रोल ९६.६२ रुपये तर पॅावर पेट्रोल १००.३ रुपये लिटर झाले आहे. तर डिझेल साठीही लिटर मागे ८६.३६ रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान अनेक पेट्रोल पंपावर १०० रुपयांच्या कॅलिब्रेशनची सोय नसल्याने अडचणी येत होत्या. त्यामुळे आज किती पेट्रोल पंप सुरळीत सुरु राहतात ते पहावे लागेल.