पिरंगुट येथे पिरंगुट क्रिकेट क्लबच्या वतीने फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा या स्पर्धेमध्ये मुळशी तालुक्यातील नामांकित २० संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन माजी सभापती बाळासाहेब पवळे, माजी आदर्श सरपंच बाळासाहेब गोळे, सरपंच चांगदेव पवळे, उपसरपंच लक्ष्मण निकटे आदींच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेचा अंतिम सामना कासारसाई आणि पिरंगुट या दोन संघात झाला. हाडशी क्रिकेट क्लबने तृतीय क्रमांक, तर म्हाळुंगे क्रिकेट क्लबने चतुर्थ क्रमांक क्रमांक मिळविला.
स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून म्हाळुंगे संघाचा शुभम सुतार तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कासारसाई संघाचा अक्षय शितोळेला गौरविण्यात आले.पिरंगुट संघाच्या तनुज पवळेने मालिकावीर किताब मिळविला.
स्पर्धेच्या बक्षिस वितरणप्रसंगी महादेव कोंढरे,बाळासाहेब गोळे,चांगदेव पवळे,प्रकाश पवळे,सुनील चांदेरे, लक्ष्मण निकटे,रामदास पवळे,रमेश पवळे,दिलीप पवळे,महादेव गोळे, दिपक गोळे,प्रवीण कुंभार,राहुल पवळे,महेश वाघ,विकास पवळे,वैभव पवळे,भानुदास गोळे,रत्नाकर पवळे, दिलीप गोळे,तुषार पवळे,संतोष पवळे, सागर पवळे,उमेश गोळे,मोहन आवळे,चेतन गोळे,गणेश पवळे, प्रज्योत चौधरी उपस्थित होते.
-----------------------
फोटो ओळ :पिरंगुट येथे पिरंगुट करंडक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या कासारसाई संघाला बक्षिस देताना उपस्थित मान्यवर व आयोजक.