आसखेड: कर्जत-वांद्रासह भीमाशंकर, पाबळ, चाकण असे सगळे रस्ते जोडून सुमारे १४० किलोमीटर रस्तेजोड करण्याचे नियोजन येत्या काही काळात होणार आहे. त्यामुळे सुयोग्य दळणवळणामुळे खेड तालुक्याचे महत्त्व अधिकच वाढणार, असे प्रतिपादन दिलीप मोहिते-पाटील यांनी केले.
करंजविहिरे-शिवे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी करंजविहिरे येथे मोहिते पाटील बोलत होते.
कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, जि. प. बांधकाम विभागाचे माजी सभापती अरुण चांभारे, युवकचे तालुकाध्यक्ष कैलास लिंभोरे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकार, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे, अमोल पानमंद ,माजी प.स.सदस्य रोहिदास गडदे, रवी गाढवे, एम. के. सोनवणे, देवराम सोनवणे, सरपंच शिल्पा सोनवणे, शरद मुऱ्हे ,बाळासाहेब मुऱ्हे संदीप बधाले ,सुदाम कोळेकर, सयाजी कोळेकर, गुलाब शिवेकर, हेमंत काळडोके, अभियंता संतोष पवार, पंतप्रधान सडकचे अभियंता कोळेकर, उपअभियंता भिंगारदिवे, ठेकेदार जयसिंग भोगडे आदींसह ग्रामस्थ उपस्तिथ होते.आमदार मोहिते पाटील पुढे म्हणाले की, रस्त्याच्या कामास सुरुवात होणार आहे. कामाबाबत साशंकता वाटली तर लगेच सांगा. नाही तर रस्ता पूर्ण झाल्यानंतर काम निकृष्ट दर्जाचे झाले असे बोलू नये. त्यामुळे आतापासूनच कामावर लक्ष ठेवा.
यावेळी, निघोजे-कुरुळी (राष्ट्रीय महामार्ग), थोपटवाडी ,करंजविहिरे ते वाहागाव ,भालसिंगवाडी या चार रस्त्यांचे (सुमारे ७२६ लक्ष रुपयांचे) भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले.
२४ आसखेड
करंजेविहिरे-शिव रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी दिलीप मोहिते-पाटील, निर्मला पानसरे व इतर.