पुणे : अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांची जन्मशताब्दी साहित्यविश्वातील एक अभूतपूर्व योग आहे. पुलंनी आपल्या अष्टपैलू गुणांनी स्वत: कलांचा आस्वाद घेतलाच; पण अनंत हस्तांनी तो आनंद द्विगुणित करुन रसिकांवर उधळणही केली. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पु. ल. कुटुंबियांच्या वतीने दुर्मिळ दृक-श्राव्य ठेवा रसिकांसाठी खुला केला जाणार आहे. यानिमित्ताने रसिकांना पुलंची अप्रकाशित भाषणे लघुपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. नाटक, संगीत व आभार व्यक्त करणारे एक अशा तीन भाषणांचा समावेश या लघुपटात केला आहे; या भाषणांबद्दल मान्यवरांचा अभिप्राय असणार आहे.८ नोव्हेंबर २०१८ ते ८ नोव्हेंबर २०१९ हे पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. हे औचित्य साधून पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीने आणि भारतातील सुमारे २० शहरांत आणि भारताबाहेरील ५ खंडांमधील सुमारे ३० शहरांत आयोजित केला जात आहे, अशी माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी ज्योती ठाकूर, सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, डॉ. सतीश देसाई, गजेंद्र पवार, कृष्णकुमार गोयल, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मेघराज राजेभोसले, नयनीश देशपांडे, मयूर वैद्य उपस्थित होते.पुलंच्या भांडारकर रस्त्यावरील मालती माधव या निवासस्थानी गुणीजनांचा मेळा ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत भरणार आहे. यासाठी चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य, कला व अन्य क्षेत्रांतील मान्यवरांना आमंत्रित करण्यात येणार आहे. जन्मशताब्दीची सुरुवात बालगंधर्व रंगमंदिरात विशेष सोहळयात सायंकाळी ५ ते रात्री ८ दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, अ. भा. नाट्यपरिषद, अ. भा. चित्रपट महामंडळ या संस्थांच्या सहयोगाने हा सोहळा संपन्न होईल.ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते ग्लोबल पुलोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात येईल.-------------पुलंचे साहित्य सर्वांसाठी खुले आहे, असा सर्वत्र समज पसरला आहे. प्रत्यक्षात, सुनीताबाईंनी केवळ पुलंनी लिहिलेल्या नाटकांच्या प्रयोगांचे हक्क खुले केले होते. तसेच, या नाटकांतील शब्दही बदलू नये, अशी अट घातली होती. पुलंच्या साहित्याचे सर्व हक्क आयुकाकडे हस्तांतरित केले. सध्या या हक्कांबाबत निर्माण झालेला गोंधळ मिटवून प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरु आहे.
पुलंच्या अप्रकाशित भाषणांचा दृकश्राव्य ठेवा उलगडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 1:39 PM
रसिकांना पुलंची अप्रकाशित भाषणे लघुपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत...
ठळक मुद्देग्लोबल पुलोत्सव : जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून विशेष सोहळा८ नोव्हेंबर २०१८ ते ८ नोव्हेंबर २०१९ हे पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष नाटक, संगीत व आभार व्यक्त करणारे एक अशा तीन भाषणांचा समावेशजन्मशताब्दीची सुरुवात बालगंधर्व रंगमंदिरात विशेष सोहळयाने