वडगावशेरी गावठाणातील स्मशानभूमीची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:11 AM2021-03-27T04:11:16+5:302021-03-27T04:11:16+5:30
वडगावशेरी-कल्याणीनगर प्रभाग क्र.5 मधील वडगावशेरी गावठाणामधील स्मशानभूमीत गॅसदाहिनी येथे नागरिकांना अंत्यसंस्कार करण्यास अनेक अडचणी येत आहेत. स्वच्छतागृह अत्यंत ...
वडगावशेरी-कल्याणीनगर प्रभाग क्र.5 मधील वडगावशेरी गावठाणामधील स्मशानभूमीत गॅसदाहिनी येथे नागरिकांना अंत्यसंस्कार करण्यास अनेक अडचणी येत आहेत.
स्वच्छतागृह अत्यंत अस्वच्छ आहे. पाण्यासाठी बोअर असून, त्याचा विजेचा फलक तुटलेला आहे. सर्व विद्युत खांबावरील दिवे बंद आहेत. नळ बसविले आहेत, पण त्याला पाणी येत नाही. त्यामुळे तेथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना या गैरसोयीचा त्रास हाेत आहे.
जर येत्या ८ दिवसांत याविषयी लक्ष न घातल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असे मनसेने सहा. आयुक्त नगररोड क्षेत्रीय कार्यालय यांना इशारा दिला. या वेळी नगर रस्ता क्षेत्रीय मनसेचे अच्युतराव मोळावडे, अरुण येवले, गणेश पाटील, दशरथ चव्हाण, गणेश भोपळे, श्रीराम पाटील, राहुल लुंकड यांनी लेखी निवेदन दिले.
★★★
फोटो ओळ:-वडगावशेरी स्मशानभूमीतील गॅसदाहिनीची झालेली दयनीय अवस्था.