हिर्डोशी खोऱ्यात एसटीअभावी विद्यार्थ्यांसह प्रवासी नागरिकांचे हाल, एसटी सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:10 AM2021-03-25T04:10:26+5:302021-03-25T04:10:26+5:30

यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना भोरला येण्यास किंवा बाहेरगावी जाण्यासाठी एस.टी नाही.त्यामुळे तासंतास वाट पाहून खाजगी गाड्यांचा आधार घ्यावा लागत ...

The plight of migrant citizens with ST-deprived students in Hirdoshi Valley, demand to start ST | हिर्डोशी खोऱ्यात एसटीअभावी विद्यार्थ्यांसह प्रवासी नागरिकांचे हाल, एसटी सुरू करण्याची मागणी

हिर्डोशी खोऱ्यात एसटीअभावी विद्यार्थ्यांसह प्रवासी नागरिकांचे हाल, एसटी सुरू करण्याची मागणी

Next

यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना भोरला येण्यास किंवा बाहेरगावी जाण्यासाठी एस.टी नाही.त्यामुळे तासंतास वाट पाहून खाजगी गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.त्यामुळे लाॅकडाऊनच्या काळात बंद असलेली हिर्डोशी एस.टी.बस सुरु पुन्हा करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

नीरा देवघर धरणभागातील हिर्डोशी खोऱ्यात धरणाच्या काठावरील रिंगरोडवरील साळव,रायरी,धारांबे,कंकवाडी,धानवली

प-हर बुद्रुक, प-हर खुर्द,गुढे,निवंगण,शिरवलीहि,माझेरी कुडली बुद्रुक,कुडली खुर्द,दुर्गाडी,अभेपुरी,मानटवस्ती या गावांसाठी सकाळी व सायंकाळी एस.टी बस सेवा लाँकडाऊनच्या काळात बंद होती मागिल दोन तीन महिन्यांपासुन एस,टी सेवा

सुरु झाली आहे.माञ अनियमित असुन मधल्या वेळेत एस,टी सेवा सुरु नाही.तर रायरी गाडी नियमित आणी वेळेत जात नाही.त्यामुळे लोकांना खाजगी गाडयांचा आधार घ्यावा लागत आहे.त्यामुळे नियमित आणि वेळेत एसटी गाड्या सोडण्याची मागणी होत आहे.

महाड भोर रस्त्यावरील देवघर,कोंढरी,वेणुपुरी,हिर्डोशी

धामुणशी,वारवंड,कारुंगण,शिरगाव,उंबार्डेवाडी,उंबार्डे,शिळींब

कुंड,राजिवडी,साळुंगण या गावांसाठी सायंकाळी ६ वाजता मुक्कामी एस.टी.बस जाते. तीच बस सकाळी सात वाजता परत भोरला येते.या दोनच गाड्या आहेत.हिर्डोशी एस.टी.बस लाॅकडाऊनच्या काळात बंद केली आहे.अद्याप ती एस.टी सुरु झाली नाही.त्यामुळे सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळात एकही एस.टी.बस नाही. वरंध घाटात रस्त्याचे काम सुरु आहे.त्यामुळे महाडला जाणारी वाहतूक बंद असल्याने खाजगी गाड्याही बंद आहेत.त्यामुळे

शालेय मुलांसह प्रवासी नागरीकांना रस्त्यावर तासंतास खाजगी वाहनांची वाट पाहात थांबावे लागत आहे. भोर हिर्डोशी दुपारी व सायंकाळी दोन एस.टी.बस सुरु करण्याची मागणी हिर्डोशी भागातील नागरिक करीत आहेत. माञ भोर एस.टी आगाराकडून अद्याप दखल घेतलेली नाही.

शिवाय सुरु असलेल्या गाडया वेळेत आणि नियमित नाहीत,

खाजगी गाडयाही कमी आहेत. एस.टी सेवा पुन्हा सुरु करण्याची मागणी बाळासो मालुसरे व संदीप धामुणसे यांनी केली आहे.

भोर महाड रस्त्यावरील हिर्डोशी येथे रस्त्यावर ताटकळत उभे असलेले प्रवासी.

Web Title: The plight of migrant citizens with ST-deprived students in Hirdoshi Valley, demand to start ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.