नशा करण्यासाठी दराेड्याच्या तयारीत असणाऱ्या टाेळक्याला पाेलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 06:38 PM2019-05-10T18:38:54+5:302019-05-10T18:40:30+5:30
नशा करण्यासाठी तसेच दारु पिण्यासाठी पैसे हवे असल्याने येरवडा भागातील टाेळके दराेड्याच्या तयारीत असताना पाेलिसांनी त्यांना अटक केली.
पुणे : नशा करण्यासाठी तसेच दारु पिण्यासाठी पैसे हवे असल्याने येरवडा भागातील टाेळके दराेड्याच्या तयारीत असताना पाेलिसांनी त्यांना अटक केली. येरवडा भागातील एका सराफाच्या दुकानावर टाेळके दराेडा टाकणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी आराेपींना पकडले. त्यांच्याकडे चाैकशी केली असता त्यांनी विविध सहा पाेलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आठ गुन्हे केल्याचे समाेर आले. त्यांच्याकडून पाच लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुरज ज्ञानेश्वर जाधव (वय 22), मनाेज बबन गायकवाड (वय 35), आकाश भगवान मिरे (वय 21), विजय काशीनाथ कांबळे (वय 31), सागर दिपक अडागळे ( वय 20), रुपेश दिलीप अडागळे (वय 21 ), अभिजीत अनिल मिसाळ (वय 20, सर्व रा. येरवडा) अशी आराेपींची नावे आहेत. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी 6 च्या सुमारास बंडगार्डन पाेलीस स्टेशनच्या हद्दीत एका निर्जन स्थळी एका व्यक्तिला टाेळक्यांनी अडवून त्यांची साेन्याची चैन व राेख रक्कम लुबाडली हाेती. या गुन्हातील आराेपींचा शाेध घेण्यासाठी तसेच येरवडा पाेलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययाेजनांसाठी येरवडा पाेलीस पथकातील कर्मचारी गस्त घालत हाेते. यात येरवडा तपास पथकातील पाेलीस उप निरीक्षक मंगेश भांगे, पाेलीस नाईक अशाेक गवळी शरद बांगर, पाेलीस शिपाई राहुल परदेशी, सुनिल नागलाेत यांचा समावेश हाेता. हे पथक गस्त घालत असताना अशाेक गवळी आणि शरद बांगर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत एक तडीपार आराेपी त्याच्या साथिदारांसाेबत येरवडा येथील बंगला नं. 5 येथे उभा असून ते येरवडा भागातील साेन्याच्या दुकानावर दराेडा टाकण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळाली. पथकाने त्या ठिकाणी जाऊन टाेळक्याकडे चाैकशी केली असता ते दराेड्याच्या तयारीत असल्याचे समाेर आले. त्यांची पाेलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे 2 लाेखंडी सुरे, एक लाेखंडी राॅड, मिरची पूड, सुती दाेरी असे साहित्य मिळून आले. तसेच त्यांनी बंडगार्डन पाेलीस स्टेशनच्या हद्दीत अलंकार चाैक येथे पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीला मारहाण करुन त्याच्याकडून साेन्याची चेन, राेख रक्कम, सॅक इत्यादी चाेरल्याचे कबूल केले.
आराेपी हे येरवडा पाेलीस स्टेशन व खडकी पाेलीस स्टेशन येथील रेकाॅर्डवरील आराेपी असून त्यांच्यावर यापूर्वी वाहन चाेरी, जबरी चाेरी, मारामारी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या आराेपींकडून येरवडा, बंडगार्डन, विश्रांतवाडी, सिंहगड, विमाननगर, लाेणीकंद पाेलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आणण्यात पाेलिसांना यश आले आहे. पाेलिसांनी आराेपींकडून 7 दुचाकी, 1 साेन्याची चैन, 1 सॅक, 2 लाेखंडी सुरे, 1 लाेखंडी राॅड, मिरची पुड, सुती दाेरी, अशा पाच लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.