रंगकर्मींच्या सामानाची पाेलिसांकडून तपासणी ; पाेलिसी हिसका दाखवण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 09:58 PM2019-08-16T21:58:35+5:302019-08-16T22:01:55+5:30

मुंबईतील किस्सा काेठी या संस्थेच्या रंगकर्मींच्या नाटकाचा प्रयाेग पुण्यात हाेता. त्यावेळी चिंचवड येथील त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी पाेलिसांनी कुठलेही कारण न देता त्यांच्या सामानाची तपासणी केली.

police check the language of artists | रंगकर्मींच्या सामानाची पाेलिसांकडून तपासणी ; पाेलिसी हिसका दाखवण्याचा प्रयत्न

रंगकर्मींच्या सामानाची पाेलिसांकडून तपासणी ; पाेलिसी हिसका दाखवण्याचा प्रयत्न

Next

पुणे : चिंचवड पोलिसांच्या हडेलहप्पीपणाचा मुंबईतील रंगकमींना मध्यरात्री अडीच वाजता त्रास सहन करावा लागला. त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी मध्यरात्री जोऊन पोलिसांनी त्यांच्या साहित्याची तपासणी केली. तसेच नावांची चौकशी करत त्यांना पोलिसी हिसका दाखवण्याचा प्रयत्न केला. काहीच न सापडल्यामुळे नंतर ते निघून गेले. मात्र, त्यामुळे सगळे रंगकर्मी घाबरून गेले होते. त्यातच त्यांचा एफटीआयमधील प्रयोगही रद्द झाला.

मुंबईतील ‘किस्सा कोठी’ या युवा रंगकर्मींच्या वतीने ‘रोमिओ रविदास और ज्युलिएट देवी’ या नाटकाचे वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रयोग करण्यात येतात. जातीयतेतून दलित तरुणांच्या हत्या करण्यात आलेल्या भारतातील गुजरात आणि तामीळनाडूमधील घटनांचा या नाटकात संदर्भ आहे. संस्थेचे रंगकर्मी सध्या पुण्यात आले आहेत. 14 ऑगस्टला ललित कला अकादमीमधील प्रयोग झाला. त्यानंतर त्यांचा प्रयाेग 16 ऑगस्ट राेजी एफटीआयआयमध्ये हाेणार हाेता. परंतु काही कारणास्तव ताे रद्द झाला. 14 चा प्रयाेग झाल्यानंतर ते चिंचवड येथील एका हाॅटेलमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी गेले. 

रात्री अडीच वाजता त्यांच्या खोलीचा दरवाजा जोरजोरात वाजला. दरवाजा उघडल्यानंतर एकाच वेळी पाच ते सहा पोलीस आत आले. त्यांनी रंगकर्मीची नावे घेत त्यांना उठवले. यश खान म्हणून कोण रंगकर्मी आहे त्याची विचारणा केली. त्यानेच दरवाजा उघडला होता, त्यामुळे त्यांने मीच आहे असे सांगितले. पोलिसांनी रंगकर्मीच्या सामानाची तपासणी केली. तसेच तुम्ही एकमेकांना केव्हापासून ओळखता अशी विचारणा केली तसेच ओळखपत्राची मागणी केली. सुमारे अर्धा तास हा प्रकार सुरू होता. सगळेच कलाकार घाबरले होते. पोलिसांकडे विचारणा करत होते. त्यांच्या ग्रुपचे प्रमुखही तिथे आले. त्यांनीही पोलिसांना कशासाठी चौकशी आहे, कोणी तक्रार केली का म्हणून विचारले. मात्र त्यांना काहीही उत्तर देण्यात आले नाही. काहीच न सापडल्यामुळे सगळे पोलिस त्यांना काहीही न सांगता तिथून निघून गेले. हॉटेल मालकाला विचारले असता त्यानेही आपल्याला काहीच माहिती नाही असे सांगितले.

स्वातंत्र्यदिनी या रंगकर्मींचा शनिवार पेठेतील सुदर्शन हॉलमध्ये प्रयोग होता. तो त्यांनी घाबरलेल्या अवस्थेतच पार पाडला. दरम्यानच्या काळात पुण्यातील युवा रंगकर्मींना हा प्रकार समजला. त्यांनी या रंगकर्मींची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्याचवेळी त्यांना एफटीआयमधील नियोजित प्रयोग रद्द करण्यात आला असल्याचे समजले. त्यामुळे कलाकारांची आणखी गडबड उडाली. अतुल पेठे, धर्मकिर्ती सुमंत व अन्य काही पुणेकर रंगकर्मींच्या वतीने ऐनवेळी कर्वे रस्त्यावरील एका सभागृहात सायंकाळी हा प्रयोग पार पाडण्यात आला. 

सतकर्ता  बाळगण्याचा  अंतर्गतच तपासणी  
स्वातंत्र्यदिनामुळे सतकर्ता  बाळगण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे होणाऱ्या तपासणी अंतर्गतच ही तपासणी झाली. सगळेच लॉज तपासता येणे शक्य नसते. त्यामुळे निवडक लॉज तपासण्यात येतात. त्यात नेमके हे रंगकर्मी होते. आम्ही काही कोणाचे नाव वगैरे घेऊन चौकशी केली नाही. आम्हाला तशी खबरही नव्हती. प्राथमिक विचारणा करून नंतर आमचे पोलीस तिथून निघूनही आले. 
- भीमराव शिंगाडे- पोलिस निरीक्षक, चिंचवड पोलिस ठाणे

विना परवाना तपासणी केलीच कशी?
कोणत्याही तपासणीला सर्च वॉरंट लागते. तसे पोलिसांजवळ काहीच नव्हते. आमचे सगळे कलाकार पोलीस ज्या पद्धतीने वागत होते, त्यामुळे घाबरले होते. आम्ही वारंवार त्यांच्याकडे विचारणा करत होते, मात्र ते काहीच सांगत नव्हते. हे योग्य नाही. आमच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रयोगावर यामुळे परिणाम झाला. 
- शर्मिष्ठा साहा- दिर्ग्दशिका

प्रयोग रद्द, पण कारणे वेगळी
शुक्रवारी या नाटकाचा प्रयोग एफटीआय मध्ये होणार होता. मात्र तो ऐनवेळी रद्द झाला. तो का रद्द झाला याबाबत विचारले असता कलाकारांनी आम्हाला माहिती नाही, मात्र प्रयोग रद्द करण्यात आल्याचे सांगितले. एफटीआय मधील स्टुडंट असोसिएशने हा प्रयोग ठेवला होता. असोसिएशनचे सचिव सी आर मणीकंदन यांनी सांगितले की रंगकर्मींना सादरीकरण करण्यास सांगितले होते. मात्र ऐनवेळी त्यांनी कलाकारांच्या जेवणाविषयी सांगितले. इतक्या जणांची व्यवस्था करणे शक्य नाही असे त्यांना कळवले. त्यानंतर त्यांनीच काही संपर्क केला नाही असे मणीकंदन म्हणाले. 

Web Title: police check the language of artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.