बारामती (पुणे) : बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बदलीचे आदेश दिले आहेत.
ढवाण हे २४ सप्टेंबरपासून अर्जित रजेवर आहेत. तेव्हापासुन त्यांचा पदभार पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. सध्या ढवाण यांच्या बदलीनंतर तालुका पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार आता पोलीस निरीक्षक मोरे यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत राहणार आहे. पोलीस निरीक्षक मोरे हे पुणे ग्रामीण डायल ११२ चे पोलीस निरीक्षक आहेत.
४ ऑक्टोंबर रोजी जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक झाली. त्यात ढवाण यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला. ढवाण यांनी बदली झालेल्या ठिकाणी तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ढवाण यांच्याबाबत पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची गांभीर्याने दखल घेत त्यांची तडकाफडकी बदली झाल्याचे बोलले जात आहे.