पुणे : पुणे पाेलीस दलातील सहायक पाेलीस निरीक्षक प्रेमा विघ्नेश पाटील यांनी रिनिंग मिसेस इंडिया 2019 हा किताब पटकावला आहे. साैंदर्य आणि बुद्धीमत्तेच्या जाेरावर स्वतःला सिद्ध करत त्यांनी हा किताब पटकावला.
माेनिका शेख यांनी रिनिंग मिसेस इंडिया 2019 ही साैंदर्य स्पर्धा आयाेजित केली हाेती. बाणेर येथील ऑर्कि़ड हाॅटेल येथे रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. प्रेमा पाटील या मुळच्या कराड येथील असून त्यांनी एम. काॅम पर्यंत शिक्षण घेतले आहे. महाराष्ट्र पाेलीस दलात मागील 9 वर्षांपासून त्या पाेलीस अधिकारी म्हणून काम करत असून सध्या त्या पुणे शहर पाेलीस दलातील विशेष शाखेत कार्यरत आहेत. या व्यतिरीक्त कार्बाेनरी या सामाजिक संस्थेशी सलग्न असून संस्थेकडून केल्या जाणाऱ्या सामाजिक कामामध्ये त्या सहभागी असतात. पुण्यातील व पुण्याच्या जवळपास असलेल्या गावातील गरजु गरीब मुलांना शिकविण्याचे ही काम त्या करतात.
जी 20 समिट वरचे प्रेझेंटेशन, नृत्य आणि हजरजबाबीपणा यामुळे त्या स्पर्धेमध्ये सर्वाेत्कृष्ट ठरल्या. परेड मार्च ते रॅम्प वाॅक हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.