या कार्यशाळेचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, जेष्ठ नेते अंसित गांगुर्डे, आंबेडकरी विचारवंत, लेखक केशव वाघमारे, जे. एस. मुंतोड सर, लक्ष्य करिअर अकॅडमीचे नीलेश निंबाळकर, स्वराज अकॅडमीचे सचिन सत्रे, स्थनिक पोलीस कर्मचारी निखिल जाधव आदींच्या उपस्थितीत पार पडले. सर्व प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, याबाबत लागणाऱ्या सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ, जास्तीत जास्त युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन या वेळी आयोजक आनंद जाधव यांनी केली.
लवकरच तीन महिन्यांचे पोलीस भरती प्रशिक्षण शिबिर सुरू होणार असून शिबिरामध्ये पाच तज्ज्ञ अध्यापक, मैदानी क्रीडा चाचणीसाठी क्रीडा शिक्षक, प्रत्येक आठवड्याला सराव परीक्षा आदी सोयींची उपलब्धता युवा मित्र फौंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना उपलब्ध होणार आहे