मास्क न घालता फिरणाऱ्या तिघांकडून पोलिसास धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:09 AM2020-12-08T04:09:30+5:302020-12-08T04:09:30+5:30
पुणे : मोटारीतून जाताना मास्क न घातल्याने कारवाईस आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्याचा प्रकार सातारा रोडवर रविवारी ...
पुणे : मोटारीतून जाताना मास्क न घातल्याने कारवाईस आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्याचा प्रकार सातारा रोडवर रविवारी घडला. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विनायक सर्जेराव पोळ (वय ३२, रा. किरकटवाडी, सिंहगड रोड) आणि नरेंद्र सर्जेराव पोळ (वय ३२, रा. आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सहकारनगर वाहतूक विभागाचे पोलीस नाईक राहुल बाळासाहेब गोसावी (वय३२) यांनी फिर्याद दिली आहे. गासोवी हे सातारा रोडवरील पुष्पमंगल चौकात रविवारी सकाळी ११ वाजता कार्यरत होते. त्यावेळी एका मोटारीतून तिघे जण मास्क न घालता आले. त्यामुळे गोसावी यांना थांबविले व त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांनी गोसावी यांच्या कामात अडथळा आणून अत्यंत उद्धट वर्तन केले. गोसावी यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.