सोशल मीडियावरून पसरली जातेय राजकीय व्यंगांची हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 02:03 PM2019-11-16T14:03:22+5:302019-11-16T14:50:07+5:30

चांद्रयान २ सारखी महाशिवआघाडीची अवस्था, शेवटच्या क्षणी इटलीच्या लँडरशी संपर्क तुटला’

The political cartoon jokes is spreading on social media | सोशल मीडियावरून पसरली जातेय राजकीय व्यंगांची हवा

सोशल मीडियावरून पसरली जातेय राजकीय व्यंगांची हवा

googlenewsNext
ठळक मुद्देगमतीशीर म्हणींची चर्चा जनतेकडून राजकीय पक्ष आणि नेत्यांवर तोंडसुख..

तेजस टवलारकर 
पुणे : ‘आम्ही कसेबसे पंक्तीत घुसलो आणि बुंदी संपली, मी काय म्हणतोय, मुख्यमंत्र्यांची खुर्ची काढून सतरंजी टाका आणि सगळे बसा, मंदिरात गेलो आणि भंडाराच संपला, बाहेर आलो तर चप्पल चोरीला गेली, चांद्रयान २ सारखी महाशिवआघाडीची अवस्था, शेवटच्या क्षणी इटलीच्या लँडरशी संपर्क तुटला’ सध्या सुरू असलेल्या राज्याचा राजकारणावरून या प्रकारच्या गमतीशीर म्हणींची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. रोज नवनवीन चर्चा आणि बातम्या समोर येत आहेत. सर्वत्र राजकारणावरच चर्चा रंगत असल्याचे दिसून येते. याच राजकीय स्थितीवरून सोशल मीडियावर चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. त्यातून रोजच  नवनवीन म्हणींचा उदय होत असून जनतेकडून राजकीय पक्ष आणि नेत्यांवर तोंडसुख घेतले जात आहे.  
 राज्याच्या सत्तास्थापनेवरून सर्वच पक्षांत खलबते सुरू आहेत. फेसबुक, व्हॉट्स्अ‍ॅप गु्रपवर राजकीय नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आपल्या सोयीचे व्हिडीओ, फोटो, म्हणी, व्यंगचित्रे, मेसेज मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत. 
यातून आपला पक्ष इतर पक्षांपेक्षा कसा वेगळा आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न  कार्यकर्ते करीत आहेत. अनेक विनोदी मेसेज फिरत असले तरी त्यातून राजकारणाची प्रतिमा किती खालावलेली आहे, हे या मेसेजवरून दिसून येते. याचबरोबर व्यंगचित्रकारांच्या माध्यमातून सध्याची राजकीय स्थिती दाखवली जात आहे.
.............
ाुने व्हिडिओ शेअर करण्यावर भर 
राज्याच्या राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदललेली आहेत. अनेक वर्षे एकामेकांच्या विरोधात बोलणारे एकत्र येण्याच्या मार्गवर आहेत. यावरूनच  पूर्वी ऐकामेकांवर केलेले आरोप प्रत्यारोपांचे व्हिडीओ दाखवून आता कशी भूमिका बदलली, हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. प्रसिद्धीच्या झोतात आणले तोच सोशल मीडिया आता डोकेदुखी ठरत आहे. 
..............
राष्ट्रपती राजवटीवर विनोदी मेसेज व्हायरल
कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली सदस्यसंख्या जुळवता आली नाही; त्यामुळे  राज्यात राष्ट्रपती राजवट लागली आहे. त्यावरूनसुद्धा विनोदी मेसेज व्हायरल होत आहेत.  ‘राष्ट्रपती राजवटीत लग्न करायला चालते का? राष्ट्रपती राजवटीतही सूर्य पूर्वेकडूनच उगवला.’ या प्रकारचे विनोदी मेसेज व्हायरल होत आहेत.
.....
व्यंगचित्रांनी घातली भर 
सोशल मीडियावर व्यंगचित्रांच्या माध्यमातून सद्य:स्थिती दाखवली जात आहे. रोज नवनवीन व्यंगचित्र्े प्रसिद्ध केली जात आहेत. यातून मनोरंजनाबरोबरच हास्यसुद्धा निर्माण होत आहे. सर्वच माध्यमांवर व्यंगचित्रे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.

Web Title: The political cartoon jokes is spreading on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.