पावसाळ्यापूर्वी गवाडी-अकोले रस्त्याचे काम सुरू झाले होते. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अशा स्थितीमध्ये अकोले-बागवाडी येथील साडेपाच किमी अंतरातील ओढ्याच्या बाजूच्या रस्त्यावर खड्डे पडू लागल्याचे समोर आले आहे. रस्त्याच्या कामासाठी वापरलेले साहित्य देखील निकृष्ट असल्याचे समोर आले असून सोमनाथ दराडे यांच्यासह ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे. जोपर्यंत काम दर्जेदार होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्रीकांत टिळेकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की ठेकेदाराला रस्ता दुरुस्त करण्यास सांगितले असून लवकरच दुरुस्त करण्यात येईल. तर ठेकेदार विनीत नायर म्हणाले की, संबंधित रस्त्यासाठी निधी कमी असल्याने काम करण्यास अडचण निर्माण होत आहे, खराब झालेला रस्ता दुरुस्त करण्यात येईल.
१२ अकोले
अकोले ते बागवाडी चालू कामाच्या रस्त्यावर मागे खड्डे पडू लागले आहेत.