पुणे : विदर्भ, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधील पाऱ्याने चाळीशी पार केली. राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट असून ३ मेपर्यंत विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाटेची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. रविवारी राज्यात चंद्रपूर येथे ४६.४ अंश एवढे सर्वाधिक कमाल तापमान नोंद झाले.कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भात वर्धा, नागपूर, चंद्रपूर व ब्रम्हपुरी येथे पारा ४५ च्या वर पोहोचला आहे. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे २१.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही लोहगाव (पुणे), अहमदनगर, जळगाव, मालेगाव, सातारा व सोलापूर येथे पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातही उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे.प्रमुख शहरांमधील कमाल तापमानपुणे ३९़१, लोहगाव (पुणे) ४१़३, अहमदनगर ४३़८, जळगाव ४३.४, कोल्हापूर ३६़८, महाबळेश्वर ३३़२, मालेगाव ४३, नाशिक ३८़१, सांगली ३९़५, सातारा ४०, सोलापूर ४३़५, मुंबई ३३़८, अलिबाग ३५़३, रत्नागिरी ३३़४, पणजी ३३़७, डहाणू ३३़६, औरंगाबाद ४१.५, परभणी ४४.७, अकोला ४४़७, अमरावती ४३़८, बुलडाणा ४१.२, ब्रम्हपुरी ४६, गोंदिया ४२़५, नागपूर ४५़२, वर्धा ४५़८, यवतमाळ ४४.
विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 5:02 AM