शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची गोगावलेंची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:01 PM2018-06-27T17:01:02+5:302018-06-27T17:08:08+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुण वैशिष्ट्यांवर आधारित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा आणि या विषयात संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी विद्यारपीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेऊन केली. 

post graduate course should be started on assets of Shivaji Maharaj | शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची गोगावलेंची मागणी

शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची गोगावलेंची मागणी

Next

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुण वैशिष्ट्यांवर आधारित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा आणि या विषयात संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी विद्यारपीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेऊन केली. 

शिवाजी महाराजांचे बालपण, विजापूर घराण्याशी संघर्ष, अफजलखानाचा वध, पन्हाळ्याचा वेढा, पावनखिंडीतील लढाई, मुघलांबरोबरील संघर्ष, शाहिस्तेखानावरील हल्ला, राज्याभिषेक आदी प्रसंगांचा सविस्तर इतिहासअभ्यासक्रमाच्या पहिल्या भागात असावा आणि दुसर्‍या भागात शिवाजी महाराजांची न्याय पध्दत, अष्टप्रधान मंडळ, जमीन महसूल, चलन, व्यापार, कर पध्दती, सामाजिक व्यवस्थापन, प्रशासन, संस्कृत आणि मराठीचा प्रसार, धार्मिक धोरण, लष्कर, किल्ले, नौदल, शिवाजी महाराजांनंतरचे मराठा साम्राज्य आदी विषयांचा समावेश असावा असे गोगावले यांनी म्हटले आहे. विद्यापीठात हा  अभ्यासक्रम शिकवित असतानाच तो दूरशिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांना शिकता यावा अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी. आर्थिक मागस विद्यार्थ्यांना फेलोशिप व शिष्यवृत्ती द्यावी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विशेष उत्तेजन द्यावे. अशी मागणीही  करण्यात आली.

Web Title: post graduate course should be started on assets of Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.