औद्योगिक वसाहतीमुळे वेगाने विकासाकडे वाटचाल सुरू असलेल्या सावरदरी ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक चांगलीच गाजली. सोमनाथ तरस यांच्या श्री गोंधळाजाई परिवर्तन पॅनल व माजी सरपंच संजय चौधरी यांचे श्री गोंधळाजाई विकास पॅनल या दोन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. ग्रामपंचायतची सत्ता आपल्याच हातात राहावी यासाठी उमेदवारांकडून लाखों रुपयांची खिरापत मतदारांना वाटण्यात आली. तरीही अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले.
--
विजयी उमेदवार असे
वार्ड क्रमांक १ - ताराबाई हिरामण शेटे,भरत शांताराम तरस,मीरा अंकुश कदम, वार्ड क्रमांक २ - बारकाबाई विलास गावडे,संदीप राजाराम मेंगळे, वार्ड क्रमांक ३ - संदीप बाळू पवार आणि नीता दत्तात्रय शेटे असे सात उमेदवार विजयी झाले.
मनसेचे तालुकाध्यक्ष संदीप पवार फक्त एक मताने विजयी झाले, तर श्री गोंधळाजाई विकास पॅनलचे माजी सरपंच रेणुका शेटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रवींद्र गाढवे,गणेश तरस, प्रमिला मांजरे,माजी उपसरपंच लालू मेंगळे,जाणता मेंगळे या दिगग्ज उमेदवारांचा पराभव झाला.
--
फोटो १९ आंबेठाण सावदरी ग्रामपंचायत
फोटो ओळी : - सावरदरी ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार