गुरुवारी बारामती शहरातील वीजपुरवठा राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 08:37 PM2022-10-04T20:37:44+5:302022-10-04T20:38:44+5:30
शहरातील वीजपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद राहणार...
बारामती : गुरुवारी (दि. ६) सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत एमआयडीसी वगळता बारामती शहरातील वीजपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद राहणार असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.
महावितरणला महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. गुरुवारी महापारेषणच्या एमआयडीसी २२०/३३ केव्ही अतिउच्च्दाब उपकेंद्रात काही अतिमहत्त्वाची दुरुस्ती कामे करण्यासाठी वीजपुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे महापारेषणकडून महावितरणच्या बारामती शहर, बारामती टेक्स्टाईल पार्क व बारामती एमआयडीसी नं.१ उपकेंद्रातून निघणारी गणेश मंदिर व सूर्यनगरी वाहिनी प्रभावित होणार आहे. त्यामुळे या उपकेंद्र व त्यांच्या वाहिनीद्वारे पुरवठा केल्या जाणाऱ्या भागाचा वीजपुरवठा गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत बंद राहणार आहे.
देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी महापारेषण व महावितरणचे नियोजन आहे.नागरिकांनी याची नोंद घ्यावी,असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.