पुणे शहरातील वीजपुरवठा अनेक ठिकाणी विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 03:55 AM2018-04-06T03:55:38+5:302018-04-06T03:55:38+5:30

महापारेषण मनोऱ्याच्या (टॉवर लाईन) वीजवाहिन्यांची उंची वाढविण्याच्या नियोजित कामामुळे २२० केव्ही क्षमतेच्या दोन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा गुरुवारी (दि. ५) सकाळी ७ वाजता बंद ठेवण्यात आला होता.

Power supply in Pune city disrupts at many places | पुणे शहरातील वीजपुरवठा अनेक ठिकाणी विस्कळीत

पुणे शहरातील वीजपुरवठा अनेक ठिकाणी विस्कळीत

Next

पुणे - महापारेषण मनोऱ्याच्या (टॉवर लाईन) वीजवाहिन्यांची उंची वाढविण्याच्या नियोजित कामामुळे २२० केव्ही क्षमतेच्या दोन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा गुरुवारी (दि. ५) सकाळी ७ वाजता बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे पर्वती, पद्मावती, रास्तापेठ, कोथरूड, धनकवडी, सिंहगड रस्ता, पुणे स्थानक, दत्तवाडी परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता; मात्र दुपारी दीड ते ४ वाजे दरम्यान या भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
देहूरोड-कात्रज बायपास राष्ट्रीय महामार्गावरील मनोºयाच्या (टॉवर लाईन) वीजवाहिन्यांची उंची वाढविण्याचे काम महापारेषण कंपनीकडून गुरुवारी (दि. ५) सकाळी ७ वाजता सुरू करण्यात आले. त्यासाठी २२० केव्ही पर्वती-नांदेड सिटी व २२० केव्ही पर्वती-फुरसुंगी या दोन वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे महापारेषणच्या पर्वती उपकेंद्र्र, तसेच विविध २२ केव्ही उपकेंद्रांचाही वीजपुरवठा बंद झाला. यात रास्तापेठ, कसबा पेठ, घोरपडी, मंडई, भवानी पेठ, मुकुंदनगर, शंकरशेठ रोड, महर्षीनगर, सॅलीसबरी पार्क, वडगाव बुद्रुक, हिंगणे, विकासनगर, सिंहगड रोड, गुलटेकडी, सहकारनगर, मित्रमंडळ चौक, सुभाषनगर, पर्वती गाव, विठ्ठलवाडी, दत्तवाडी, शारदा मठ, मार्केटयार्ड, कोंढवा, कात्रज आदी परिसरातील वीजपुरवठा सकाळी ७ ते दुपारपर्यंत देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी बंद होता.

महापारेषणचे मुख्य अभियंता रोहिदास मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांच्यासह सुमारे ७० अभियंते व कर्मचारी वीजवाहिन्यांची उंची वाढविण्याच्या कामात सहभागी झाले होते. सुमारे ६ मीटर उंचीवर असलेल्या या दोन्ही २२० केव्ही वीजवाहिन्या सुमारे १२ मीटर उंचीवर नेण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी जवळच एक स्वतंत्र मनोरा उभारण्यात आला. त्यानंतर पर्वती-फुरसुंगी वाहिनीचे काम दुपारी सव्वा एकच्या सुमारास पूर्ण झाले.

Web Title: Power supply in Pune city disrupts at many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.