राजदत्त यांना प्रभात जीवनगौरव पुरस्कार जाहीर
By admin | Published: May 27, 2015 01:47 AM2015-05-27T01:47:47+5:302015-05-27T01:47:47+5:30
काळाच्या पुढे राहण्याची ‘प्रभात’ची परंपरा कायम ठेवत यंदाच्या वर्षीच्या ‘प्रभात पुरस्कारां’चे नामांकन लोकमतच्या सहयोगामुळे ‘ग्लोबल’ होणार आहे,
पुणे : काळाच्या पुढे राहण्याची ‘प्रभात’ची परंपरा कायम ठेवत यंदाच्या वर्षीच्या ‘प्रभात पुरस्कारां’चे नामांकन लोकमतच्या सहयोगामुळे ‘ग्लोबल’ होणार आहे, हे पुरस्कार आॅनलाईन होणार आहेत. यातून जगभरातील मराठी प्रेक्षकांना
प्रभात पुरस्कारांच्या नॉमिनेशनसाठी आपले मत नोंदविणेही शक्य
होणार आहे. यंदाच्या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना जाहीर करण्यात आला आहे.
प्रभात पुरस्कारांचे हे तिसरे वर्षे असून, १ जून रोजी पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत. यंदा या पुरस्कारासाठी २०१४ साली सेन्सॉरसंमत झालेले तब्बल ५१ चित्रपट दाखल झाले आहेत.
यामध्ये मुख्यत: ‘एक हजाराची नोट, ‘हॅपी जर्र्नी’, ‘ख्वाडा’, ‘नागरिक’, ‘सलाम’ या चित्रपटांमध्ये स्पर्धा आहे. ‘कॅँडल मार्च’, ‘रमा माधव’ आणि ‘लय भारी’ हे चित्रपटही अनेकभागांसाठी अटीतटीच्या स्पर्धेत आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या शर्यतीत रितेश देशमुख, आलोक राजवाडे, अतुल कुलकर्णी, सचिन खेडकर आणि सुबोध भावे आहेत.
प्रिया बापट, देविका दफ्तरदार, पूजा नायक, तेजस्विनी पंडित आणि उषा नाईक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या स्पर्धेत आहेत. दिग्दर्शनाच्या पुरस्कारासाठी भाऊसाहेब कुऱ्हाडे, जयप्रद देसाई, किरण यज्ञोपवित, सचिन कुंडलकर आणि श्रीहरी साठे यांच्यात स्पर्धा आहे.
१ जून रोजी निकालादिवशी ६६६.स्र१ुंँं३स्र४१ं२‘ं१.ूङ्मे या संकेतस्थळावर विभागवार क्रमाक्रमाने पुरस्कारांची घोषणा होत राहणार आहे. याशिवाय अधिक माहिती आणि ताजे अपडेटस फेसबुक आणि ट्विटरवर ६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे / स्र१ुंँं३स्र४१ं२‘ं१ आणि ३६्र३३ी१@स्र१ुंँं३स्र४१ं२‘ं१ उपलब्ध होणार आहेत. (प्रतिनिधी)
विविध प्रयोगांची परंपरा
च्प्रभात पुरस्कारचे विवेक दामले म्हणाले, ‘‘प्रभातने आपल्या चित्रनिर्मितीच्या काळातही उपलब्ध तंत्रज्ञानानुकुल वेगळे प्रयोग केले होते. याच परंपरेत बसणारा हा पुरस्कारांचाही प्रयत्न आहे.
च्सामान्यत: होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यापेक्षा हा वेगळा प्रयत्न असणार आहे. हे पुरस्कार आॅनलाईन जाहीर होणार आहेत.’’
च्प्रभात पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष असून, १ जून रोजी पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत. प्रभात पुरस्कारासाठी २०१४ साली तब्बल ५१ चित्रपट दाखल झाले आहेत. लोकमतच्या सहयोगामुळे नामांकन ग्लोबल होणार आहे.