पुणे रेल्वे स्थानकाजवळीस महात्मा गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसची सद्भाव, सलोख्यासाठी प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 02:26 PM2018-01-04T14:26:13+5:302018-01-04T15:01:32+5:30

कोरेगाव भीमा येथील घटना व त्यावरून राज्यात पेटलेली दंगल या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या वतीने गुरूवारी पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ सद्भाव व सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली व भजन गायन करण्यात आले.

Prayer for the goodness by Congress, near Pune railway station the statue of Mahatma Gandhi | पुणे रेल्वे स्थानकाजवळीस महात्मा गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसची सद्भाव, सलोख्यासाठी प्रार्थना

पुणे रेल्वे स्थानकाजवळीस महात्मा गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसची सद्भाव, सलोख्यासाठी प्रार्थना

Next
ठळक मुद्देसद्भाव व सलोख्यासाठी करण्यात आली प्रार्थनासामान्य जनतेचे भावना भडकावणाऱ्या नेत्यांना दूर करावे : रमेश बागवे

पुणे : कोरेगाव भीमा येथील घटना व त्यावरून राज्यात पेटलेली दंगल या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या वतीने गुरूवारी पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ सद्भाव व सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली व भजन गायन करण्यात आले. समस्त समाजाला यावेळी शांततेचे आवाहन करण्यात आले. 
पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी यावेळी राज्यातील जातीयता, धर्मांधता वाढत असल्याबद्धल खंत व्यक्त केली. याला खतपाणी घातले जात आहे, दंगलींमधून तेच दिसत आहे, अशा वेळी सामान्य जनतेचे भावना भडकावणाऱ्या नेत्यांना दूर करावे असे आवाहन त्यांनी केले. माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी यांचीही भाषणे झाली. समाजात सलोखा राहणे हेच सगळ्यांच्या हिताचे आहे. धर्म, जात, पंथ याचा द्वेश करून देशाचे भले होणार नाही, उलट नुकसानच होईल असे ते म्हणाले. पक्षाचे शहर सरचिटणीस रमेश अय्यर, संगीता तिवारी,  अजित दरेकर, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, जॉन पॉल, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सोनाली मारणे आदी यावेळी उपस्थित होते. 

Web Title: Prayer for the goodness by Congress, near Pune railway station the statue of Mahatma Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.