पर्यावरणाचे जतन व संवर्धन काळाची गरज: डॉ. प्रवीण सप्तर्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:10 AM2021-03-21T04:10:22+5:302021-03-21T04:10:22+5:30
येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने भारतातील सामाजिक, आर्थिक व पर्यावयणीय संदर्भात बदलते स्वरूप या विषयावर आयोजित ...
येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने भारतातील सामाजिक, आर्थिक व पर्यावयणीय संदर्भात बदलते स्वरूप या विषयावर आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषक म्हणून डॉ. सप्तर्षी बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे चर्चासत्राचे संयोजक व भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. रवींद्र भगत, डॉ. पराग चौधरी, डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. अमेय काळे, डॉ. दत्तात्रय वाबळे, प्रा. निलेश पाचुंदकर, प्रा. डॉ. प्रमोद पाटील, प्रा. मुल्ला यांसह आदि याप्रसंगी उपस्थित होते.
पर्यावरणाच्या श्रुखंलेमध्ये मानव हा एक महत्वाची कडी आहे, त्यामुळे संबंध पर्यावरणाचे आणि पृथ्वीवरील जीव सृष्टीचे रक्षण व संवर्धनासाठी प्रत्येकाने आपआपल्या परीने सकारात्मक योगदान देण्याची गरज असल्याचे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी संगितले. राष्ट्रीय चर्चासत्रात महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयातील तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. सदर चर्चासत्रात महाराष्ट्रातील व भारतातील विविध महाविद्यालयातून १६० प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी यांच्यासह तज्ञ व्याख्याते म्हणून गंगाखेड येथील संत जनाबाई महविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दयानंद उजळांबे, विद्यासागर महाविद्यालय कोलकत्ता येथील डॉ. बिस्वजीत रॉय चौधरी, कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाचे भूगोलाचे प्राध्यापक डॉ. संतोष लगड आदि मान्यवर उपस्थित होते. चर्चासत्राचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. पद्माकर गोरे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. डॉ. रवींद्र भगत यांनी केले .आणि प्रा. डॉ. मनोहर जमदाडे यांनी आभार मानले.
तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन चर्चासत्रात मार्गदर्शन करताना डॉ.प्रविण सप्तर्षी