साथीच्या रोगांपासून बचावासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:13 AM2021-09-12T04:13:29+5:302021-09-12T04:13:29+5:30

बारामती: शहरामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून साथीचे रोग (डेब्यू, मलेरिया, चिकुनगुणिया, गोचिड ताप, न्युमोनिया, व्हायरल इन्फेक्शन व इतर अशा प्रकारच्या) ...

To prevent epidemics | साथीच्या रोगांपासून बचावासाठी

साथीच्या रोगांपासून बचावासाठी

Next

बारामती: शहरामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून साथीचे रोग (डेब्यू, मलेरिया, चिकुनगुणिया, गोचिड ताप, न्युमोनिया, व्हायरल इन्फेक्शन व इतर अशा प्रकारच्या) साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत आहे. कित्येक नागरिक आजारी पडत आहेत. त्यामुळे यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन निकाळजे यांनी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व आरोग्य निरीक्षक यांना दिले आहे.

कोरोनाच्या काळामध्ये अशाप्रकारचे साथीच्या आजारात वाढ झाली आहे. शहरामधील विशेष करून अनुसूचित जाती, जमातीतील लोक राहत असणाऱ्या वस्त्यांमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे याठिकाणी साथीच्या रोगांचे प्रमाण खूप वाढत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन बारामती शहर तसेच बारामती मधील अनुसूचित जाती- जमातीतील वस्त्यांमधील कचरा साठणारी सर्व ठिकाणे वारंवार स्वच्छ करावी. तसेच या ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ करून, जंतूनाशक फवारणी, बेशीपावडर मारणे, धूर फवारणी अशाप्रकारच्या जंतुनाशक फवारणी करून उपाय योजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: To prevent epidemics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.