शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य : पाटील

By admin | Published: July 27, 2016 03:55 AM2016-07-27T03:55:39+5:302016-07-27T03:55:39+5:30

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास आपण प्राधान्य देणार असल्याची ग्वाही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे दिली. इंदापूर तालुका शिक्षकांची सहकारी पतसंस्थेच्या ९३ व्या

Priority to solve teachers' pending issues: Patil | शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य : पाटील

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य : पाटील

Next

इंदापूर : प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास आपण प्राधान्य देणार असल्याची ग्वाही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे दिली. इंदापूर तालुका शिक्षकांची सहकारी पतसंस्थेच्या ९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल यांनी सभेचे प्रास्ताविक केले. सभेमध्ये सभासदांची कर्ज मयार्दा दहा लाख करण्यात आली. सेवेत असताना शिक्षकांच्या कुटुंबियांना दहा लाख मदत संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे. संस्थेमधील ठेवीवर व्याज दहा टक्के देण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आले. सभेत सर्व विषयाचे वाचन करण्यात आले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सभा खेळीमेळीच्या वातावरण पार पडली. पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुनील वाघ यांनी केले. सचिव आभार किरण म्हेत्रे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील पन्नास गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक आदींचा सत्कार करण्यात आला. सामाजिक शैक्षणिक कामाबद्दल गणेश करे, परशुराम मारकड, रोहिदास बिनवडे यांना गौरविण्यात आले.
पतसंस्था संपुर्णपणे संगणकीकृत असताना देखील सात कर्मचारी कशासाठी असा काटकसरीबाबतचा प्रश्न इब्टा शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष शशिकांत शेंडे यांनी विचारला. पतसंस्थेच्या व्यवस्थापन व कार्यालयीन खचार्बाबतचा तपशील सभागृहापुढे मांडण्याची मागणी इंदापूर तालुका मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे शिक्षक अध्यक्ष सुहास मोरे यांनी केली. कर्ज काढताना सभासदांना जादा स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. ती इतर पगारदार संस्थेप्रमाणे स्टॅम्प ड्युटी कमी करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अनिल शिंदे यांनी केली. आम्हा सभासदांना लाभांश कमी मिळाला तरी चालेल, परंतू व्याजदर १० टक्क्यांवरून ९ टक्के करण्याची मागणी शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गटाचे अध्यक्ष अनिल रुपनवर यांनी केली. कल्याण निधी सध्याचा शंभर रुपयेच ठेवा. तो वाढवून दोनशे रुपये करण्याचा उपविधी स्थगित ठेवावा. शिक्षक कल्याण निधीबाबत इतर संस्थांचे योग्य धोरण लक्षात घ्यावे व राबविण्याची मागणी इब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जाधव यांनी केली.
पतसंस्थेच्या व्यवस्थापन व कार्यालयीन खचार्बाबतचा तपशील सभागृहापुढे मांडण्याच्या मागणीसह सभासदांच्या पगारातून सोसायटीने सभासद वर्गणी पंधराशे वरून दोन हजार रुपये करण्यात आल्यामुळे दरमहा पाचशे रुपये प्रमाणे वषार्चे सहा हजार रुपये व नऊ टक्क्यांवरुन व्याजदर दहा टक्के केला. परिणामी कर्जदार सभासदांकडून दरमहा एक हजार रुपये कपात होत आहे. म्हणजेच सभासदांच्या पगारातून सुमारे अठरा हजार रुपयांच्या आसपास सोसायटी कपात केली. त्यामानाने लाभांशपोटी फक्त दोन हजार रुपये वाढले आहेत. त्यामुळे लाभांश समाधानकारक दिलेला नाही. लाभांश आणखीन वाढवून मिळाला पाहिजे,अशी मागणी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुहास मोरे यांनी सभागृहापुढे केली.किशोर वाघ , सुनिल गवळी , संतोष शिंदे , संजय म्हस्के , संतोष गदादे , महावीर देवडे आदी सभासदांनी विविध प्रश्न मांडले. (वार्ताहर)

Web Title: Priority to solve teachers' pending issues: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.