पुण्यात येणाऱ्या मार्गांची वाहतूक कोंडी प्रथम फोडणार; खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 08:24 PM2019-06-28T20:24:14+5:302019-06-28T20:48:55+5:30

‘‘पुणे-नाशिक आणि पुणे-नगर या मार्गांवरील वाहतुकीचा प्रश्न जटिल आहे.

the problems solve of traffic jaam from bypass will be preferred: dr. amol kolhe | पुण्यात येणाऱ्या मार्गांची वाहतूक कोंडी प्रथम फोडणार; खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार

पुण्यात येणाऱ्या मार्गांची वाहतूक कोंडी प्रथम फोडणार; खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार

Next
ठळक मुद्देनॅशनल हायवे  आॅथोरिटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चापुणे-नगर मार्गावर पॅरलल रस्त्यांची निर्मिती करून वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

पुणे : जिल्ह्यातील पुणे-नाशिक मार्ग आणि पुणे नगर मार्गाचा वाहतुकीचा प्रश्न जटील आहे. तो सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत. त्या दृष्टीने खेड घाटातील प्रलंबित कामे आणि नारायणगाव येथील बायपासची कामे प्राधान्याने केली जातील. तसेच, पुणे-नगर मार्गावर पॅरलल रस्त्यांची निर्मिती करून वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. 
जिल्हा परिषदेत शुक्रवारी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, त्या वेळी डॉ. कोल्हे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पुणे-नाशिक आणि पुणे-नगर या मार्गांवरील वाहतुकीचा प्रश्न जटिल आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी नॅशनल हायवे आॅथोरिटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध पर्यायांचा विचार सुरू आहे. खेड बायपासची कामे का रखडली, याची माहिती घेतली असून स्थानिकांशीही चर्चा करून नेमक्या काय समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
‘‘पुणे-नाशिक मार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी पुणे आणि पश्चिम भागात कोलायट्रल रस्त्यांची निर्मिती करून त्यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. कारण, कोंडीवर तात्पुरता उपाय न करता भविष्यातील वाहनांची संख्या लक्षात घेऊन त्या दृष्टीने उपाययोजना आखणार आहोत.’’
पुणे-नगर मार्गावरील वाघोली परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी उड्डाणपुलांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या या परिसरातील लोकसंख्येची घनता बघता, चार लेनऐवजी आठ लेनची आवश्यकता आहे. संपूर्ण मार्गावर १९ उड्डाणपूल प्रस्तावित आहेत; मात्र त्याआधी या परिसरात पॅरलल रस्ते बांधून वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासोबतच पीमआरडीए हद्दीतीतील अवैध बाधकामे तसेच रेड झोनचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे कोल्हे म्हणाले.
राष्ट्रीय पेयजल योजना आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कुठल्या योजना सुरू आहेत, याची माहिती घेतली. पुढच्या आराखड्यात जवळपास २३४ योजना प्रस्तावित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ९ योजना प्रस्तावित आहेत. येत्या काळात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असेही कोल्हे यांनी सांगितले. 

(चौकट )
पर्यटनवाढीसाठी किल्ले शिवनेरीवर रोपवेचा प्रस्ताव
जुन्नर तालुक्यात किल्ले शिवनेरीवर पर्यटनवाढीच्या दृष्टीने रोपवेचा प्रस्ताव पीडल्ब्यूडीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. त्याचा विकास आराखडा लवकरच तयार होईल. तसेच, भक्तिशक्ती कॉरिडॉरबाबतचा आराखडाही पर्यटनमंत्र्यांसमोर मांडणार आहे. पहिल्या टप्प्यात जमिनीवरून किल्ल्यावर, असा रोपवेचा प्रस्ताव आहे.

-----------------------------------


 

Web Title: the problems solve of traffic jaam from bypass will be preferred: dr. amol kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.