कारभारीला खांद्यावर घेत कारभारणिने काढली मिरवणुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:14 AM2021-01-19T04:14:48+5:302021-01-19T04:14:48+5:30
निवडणुकीमध्ये एखादा नेता निवडून आला तर कार्यकर्ते त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष करतात, महिला निवडणून आली तर तिचे पती, भाऊ ...
निवडणुकीमध्ये एखादा नेता निवडून आला तर कार्यकर्ते त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष करतात, महिला निवडणून आली तर तिचे पती, भाऊ तिला दोन्ही दोन्ही हाताने उचलून घेतात मात्र पती निवडून आला म्हणून पत्नीने खांद्यावर उचलून मिरवणूक काढावी अशी घटना तुम्ही आज पर्यंत ऐकली नसेल मात्र ही घटना घडली पुण्यातल्या खेड तालुक्यातील पाळू या गावात.
पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव हे यांनी २२१ मते मिळवून विरोधी उमेदवारावर (४४) दणदणीत विजय मिळविला. त्यामुळे त्यांच्या पत्नी रेणुका गुरव यांनी आनंदोत्सव साजरा करताना पतीराजांना थेट खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढली. यंदा कोरोनामुळे जास्त कार्यकर्त्यांना एकत्र जमण्यास बंदी असल्याने त्या कायद्याच पालन करताना मिरवणुकीचा जल्लोष करण्यासाठी कार्यकर्त्यांपासून ‘फिजिकल डिस्टन्स’ पाळताना रेणुकां यांनी स्वत:च पतीराजांना खांद्यावर घेतले आणि गावामध्ये चक्कर मारली व त्या पाठीमागेकार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाच्या घोषणा देत गुलाल उधळला.
पाळू ग्रामपंचायतीमध्ये जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने ७ पैकी ६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले. पाईट विकास सोसायटीचे चेअरमण रामदास सावंत व माजी सरपंच बबन सावंत यांच्या नेतृत्वाखाली जाखमाता देवी ग्रामविकास पॅनलने जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा पराभव करत निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. ग्रामपंचायतीमध्ये ७ पैकी दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या त्या दोन्हीही जागा जाखमाता देवी ग्रामविकास पॅनेलकडे आहे.
यामध्ये विद्यमान सरपंच रामदास मारूती केदारी ( १७७ ) मते यांना पराभवाचा सामना करावा लागला असुन त्यांचा संतोष शंकर गुरव यांना २२१ मते मिळवत ४४ मतांनी पराभव केला.
--
चौकट
विजय उमेदवार असे
प्रभाग क्र १- संतोष शंकर गुरव (२२१), सिताराम चिमाजी गायकवाड (२०६) विजयी, प्रियांका रमेश सावंत (बिनविरोध). प्रभाग क्र २-
कुंदा अमोल सावंत (बिनविरोध), प्रभाग क्र ३- सुधाकर सखाराम केदारी (विजयी), आश्विनी बाजीराव केदारी (विजयी )