सेवाजेष्ठतेप्रमाणे बढती द्या, ई तिकीट मशीनचा वापर थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:09 AM2021-07-22T04:09:27+5:302021-07-22T04:09:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपी कर्मचाऱ्यांना २०१३ सालच्या सेवाजेष्ठतेप्रमाणे बढती द्या, सातव्या वेतन आयोग आधारित टाकलेल्या नवीन करारास ...

Promote seniority, stop using e-ticket machine | सेवाजेष्ठतेप्रमाणे बढती द्या, ई तिकीट मशीनचा वापर थांबवा

सेवाजेष्ठतेप्रमाणे बढती द्या, ई तिकीट मशीनचा वापर थांबवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पीएमपी कर्मचाऱ्यांना २०१३ सालच्या सेवाजेष्ठतेप्रमाणे बढती द्या, सातव्या वेतन आयोग आधारित टाकलेल्या नवीन करारास अंतिम मान्यता मिळाल्याने त्याची त्वरित अंमलबजावणी करणे, नव्याने वापरात आणलेले ई तिकीट मशीन सातत्याने बिघडत आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती होईपर्यंत त्याचा वापर थांबविणे आदी विविध मागण्य मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा पी.एम.टी. कामगार संघ (इंटक) यांनी दिला.

इंटक ने दिलेल्या मागणीच्या निवेदनात असे म्हटले आहे की, वाहतुक व वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांना बढती देताना तत्कालीन अध्यक्षांनी सेवाजेष्ठ कर्मचऱ्यांची नाहक परीक्षा घेतली. त्यानुसार बढती दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा मोठे नुकसान झाले. पूर्वीच्या अध्यक्षांनी दिलेल्या सर्व बढत्यांची चौकशी करून त्यात फेरबदल करून आस्थापनेप्रमाणे बढती देणे. तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेले महागाई भत्ते फरकासह त्वरित अदा करावे आदी मागणी करण्यात अली.

Web Title: Promote seniority, stop using e-ticket machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.