ईव्हीएम हटाअाे, लाेकशाही बचाव ; काॅंग्रेस, राष्ट्रवादीचा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 02:47 PM2018-05-19T14:47:13+5:302018-05-19T14:47:13+5:30
ईव्हीएम हटाअाे लाेकशाही बचाअाे अशा घाेषणा देत काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने पुणे स्टेशन येथील अांबेडकर पुतळ्याजवळ अांदाेलन करण्यात अाले.
पुणे : ईव्हीएम हटाअाे, लाेकशाही बचाअाे अशा घाेषणा देत ईव्हीएम मशीन एेवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी शहर काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून करण्यात अाली. शनिवारी सकाळी पुणे स्टेशन येथील अांबेडकर पुतळ्याजवळ अांदाेलन करण्यात अाले. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अामदार जयदेव गायकवाड, माजी अामदार माेहन जाेशी, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, नगरसेवक अाणि कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
मागील काही निवडणूकांमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यात येत असल्याचा अाराेप दाेन्ही पक्षांकडून यावेळी करण्यात अाला. या अांदाेलनाविषयी बाेलताना वंदना चव्हाण म्हणाल्या, अाज अाम्ही दाेन्ही पक्षांनी ईव्हीएम विराेधात अांदाेलन पुकारलं अाहे. कर्नाटकच्या निवडणूकीतही ईव्हीएमचा घाेळ झाल्याचे समाेर अाले अाहे. ईव्हीएममधील गडबडीमुळे एका मतदार संघातील निकाल राखून ठेवला हाेता. पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीतही ईव्हीएमचा घाेळ झाल्याचे अापण पाहिले. जितकं मतदान झालं तितकं माेजताना मशीनमध्ये दिसणे अावश्यक अाहे. मात्र अनेक ठिकाणी बेरजेत घाेळ झाले अाहेत. त्यामुळे ईव्हीएम व्यवस्थित चालत नसल्याचे समाेर अाले अाहे. लाेकशाहीचा महत्त्वाचा भाग असलेलं प्रत्येक नागरिकाचं मत हे माेजताना ग्राह्य धरले पाहिजे, तरच नागरिकांचा लाेकशाहीवर विश्वास बसेल. म्हणून अामची मागणी अाहे की यापुढील काळात ईव्हीएम एेवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे.
रमेश बागवे म्हणाले, ईव्हीएममध्ये घाेटाळे हाेत असल्याचे वारंवार समाेर अाले अाहे. पुणे महानगरिपालिकेच्या निवडणूकीमध्ये सुद्धा प्रत्यक्ष झालेले मतदान अाणि मतमाेजणी नंतर समाेर अालेली अाकडेवारी यांच्यात तफावत असल्याचे समाेर अाले हाेते. ईव्हीएममध्ये छेडछाड हाेत असल्याची शंका नागरिकांना येत अाहे. सर्वप्रथम भाजपचे किरिट साेमय्या अाणि सुब्रमण्यम स्वामी यांनीच ईव्हीएमवर अाक्षेप घेतला हाेता. ईव्हीएमचा शाेध ज्या देशाने लावाला त्या देशातही अाता ईव्हीएमवर मतदान घेतले जात नाही. त्याचबराेबर जगातील अनेक प्रगत देशांमध्ये ईव्हीएम एेवजी बॅलेट पेपरवरच मतदान घेतले जाते. त्यामुळे अामची मागणी अाहे की, ईव्हीएममध्ये घाेळ हाेत असल्याचे वारंवार समाेर अाल्याने ईव्हीएम एेवजी बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे.