...म्हणून तेरा तारखेला तेरा कार्यकर्त्यांनी मुंडन करून घातला सरकारचा तेरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 06:23 PM2018-08-13T18:23:40+5:302018-08-13T18:35:24+5:30

तेरा तारखेचे औचित्य साधून तेरा कार्यकर्त्यांनी मुंडन करून प्रतिकात्मक स्वरुपात सरकारचे ‘‘तेरावे’’ घातले. 

protest against government at Pune | ...म्हणून तेरा तारखेला तेरा कार्यकर्त्यांनी मुंडन करून घातला सरकारचा तेरावा

...म्हणून तेरा तारखेला तेरा कार्यकर्त्यांनी मुंडन करून घातला सरकारचा तेरावा

Next

पुणे : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारत रत्न’ या उच्च पुरस्काराने गौरावांकीत करावे ही माागणी सरकारकडे सातत्याने करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे जाहीरपणे मुंडन करण्यात आले. यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली  तेरा तारखेचे औचित्य साधून तेरा कार्यकर्त्यांनी मुंडन करून प्रतिकात्मक स्वरुपात सरकारचे ‘‘तेरावे’’ घातले. 

यावेळी बोलताना  झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवानराव वैराट म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये साहित्यरत्न लोकशाहिर स्व.अण्णाभाऊ साठे यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. मरणोत्तर ‘भारत रत्न’ या उच्च पुरस्काराने गौरावांकीत करावे, या मागणीकडे होणारे दुर्लक्ष अक्षम्य आहे. आज झालेल्या या निषेध आंदोलनाची योग्य ती दखल न घेतली गेल्यास हे आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल, असा इशाराहीवैराट यांनी दिला. यावेळी रोहित वैराट, संतोष बोताळजी, काशिनाथ गायकवाड, महंमद शेख, प्रदीप पवार, सुनीता अडसूळ, सचिन जोगदंड, सुरेखा भालेराव, दत्ता कांबळे, दत्ता डाडर, गणेश लांडगे, संतोष जगताप, संतोष सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: protest against government at Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे