पुणे : यात्रेनिमित्त केलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीत तरुण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 03:05 PM2018-04-09T15:05:44+5:302018-04-09T15:05:44+5:30
कुरुळी येथील यात्रेनिमित्त झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीत एक 20 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
हनुमंत देवकर
चाकण : कुरुळी येथील यात्रेनिमित्त झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीत एक 20 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी ( 8 एप्रिल ) रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये रितेश विलास डोंगरे भाजल्यानं गंभीर स्वरुपा जखमी झाला आहे. अन्य दोन जण देखील जखमी झाले आहेत, मात्र त्यांची नावं अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाहीत.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कुरुळी गावचे ग्रामदैवत काळभैरवनाथ महाराजांची यात्रा होती. या गावात कालभैरवनाथाला नवस बोलल्याने मागील तीन चार पिढ्यांपासून पुण्यातील एक दारूवाला नावाने ओळख असलेली व्यक्ती दरवर्षी यात्रेत फटाक्यांची आतिषबाजी करते, तेव्हापासून गावात आतिषबाजी करण्याची परंपरा आहे.
त्यासाठी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून बिदागीही दिली जाते, असे ग्रामस्थ सांगतात. रविवारी फटाक्यांची आतिषबाजी होत असताना ग्रामस्थांनी व पाहुण्यांनी आतिषबाजी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दारूवालाचे दोन कामगार व रितेश हे फटाक्यांच्या स्टॉकजवळ होते. यावेळी फटाक्यांची ठिणगी या स्टॉकवर पडल्याने अचानक मोठा स्फोट झाला व यात रितेशच्या कपड्यांनी पेट घेतला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.