पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढून देशात तिसरी लाट आली आहे. पुणे शहरातही दररोज ५ हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत. अशा वेळी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले असून त्याची तपासणी कडक करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसात पुणे शहर पोलीस दलाने विनामास्क फिरणाऱ्या ७ हजार ७७५ नागरिकांवर कारवाई केली असून,त्यांच्याकडून ३३ लाख २ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
५० रुपयांचा मास्क की ५०० रुपयांचा दंड
यापूर्वी मास्कचे दंड खूप होते; मात्र आता अतिशय माफक दरात सर्वत्र एन ९५ चे मास्कही भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. असे असतानाही अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत. त्यामुळे ५० रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीत मिळणारा मास्क न वापरल्याने ५०० रुपयांचा भुर्दंड तुम्हाला बसू शकतो.
यापूर्वी पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या काळात पुणे पोलिसांनी ५ लाख ४२ हजार ३७४ नागरिकांना विनामास्कची कारवाई केली असून त्यांच्याकडून तब्बल २६ कोटी ५२ लाख १९ हजार ६५० रुपये दंड वसूल केला आहे.
दिवस कारवाई दंड
७ जानेवारी ३९१ १९५५००
८ जानेवारी ७२९ ३५७०००
९ जानेवारी ८०५ ४०२५००
१० जानेवारी १०५२ ४२६०००
११ जानेवारी १०८५ ४४२५००
१२ जानेवारी ९६९ ४८४५००
१३ जानेवारी ८९५ ४४७५००
१४ जानेवारी ८४२ ४२१०००
एकूण ७७७५ ३३०२१००