पुणे : व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; दोघा भागीदारांसह चौघांवर गुन्हा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 06:37 AM2018-02-27T06:37:49+5:302018-02-27T06:37:49+5:30

भागीदारांनी केलेल्या घोटाळ्यामुळे आता गुंतवणूकदारांचे पैसे कसे द्यायचे, या विचाराने मानसिक दबावातून व्यावसायिकाने गोळी झाडून घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली होती़ याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघा भागीदारांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़

Pune: Commercial Suicide Case; Crime against two partners with two partners | पुणे : व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; दोघा भागीदारांसह चौघांवर गुन्हा  

पुणे : व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; दोघा भागीदारांसह चौघांवर गुन्हा  

Next

पुणे : भागीदारांनी केलेल्या घोटाळ्यामुळे आता गुंतवणूकदारांचे पैसे कसे द्यायचे, या विचाराने मानसिक दबावातून व्यावसायिकाने गोळी झाडून घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली होती़ याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघा भागीदारांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
अरविंद लक्ष्मण फाळके (वय ५७, रा़ अमर कॉटेज, भोसलेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे़ तर शिवाजी जाधव आणि सुनील गोसावी अशी गुन्हा दाखल झालेल्या त्यांच्या भागीदारांची नावे आहेत़
आॅगस्ट २०१६ पासून हा प्रकार सुरु होता़ सध्या बँकांची फसवणूक केल्याच्या घोटाळ्यांची सर्वत्र चर्चा आहे़
आता त्यामुळे या गुंतवणूकदारांचे पैसे कोठून द्यायचे, याबाबत अरविंद फाळके यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव निर्माण झाला़ तसेच त्या चौघांनी त्यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती़ यामुळे अरविंद फाळके हे प्रचंड मानसिक दबावात होते़ शुक्रवारी ते सौदामिनी फायनान्सच्या कार्यालयात आले़ त्यांनी घरून आणलेला डबा खाल्ला़ त्यानंतर, ‘मी झोपतो’ असे सांगून ते आपल्या केबिनमध्ये गेले़
काही वेळाने साडेतीनच्या सुमारास गोळी झाल्याचा आवाज आला़ तो आवाज ऐकून कार्यालयातील लोक त्यांच्या केबिनमध्ये गेले़
तेव्हा फाळके हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते़ त्यांनी आपल्याकडील रिव्हॉल्व्हरमधून छातीत गोळी झाडून घेतली होती़ तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले़ परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता़
शिवाजी जाधव व सुनील गोसावी हे त्या वेळी एका लग्नासाठी कर्नाटकला गेले होते़ त्यांना ही बाब समजल्यावर ते फरार झाले आहेत़ अक्षय फाळके यांच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड अधिक तपास करीत आहेत़
६ ते ८ कोटी रुपयांचा घोटाळा?
याप्रकरणी अक्षय अरविंद फाळके (वय २८, रा़ भोसलेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद फाळके यांनी शिवाजी जाधव व सुनील गोसावी यांच्याबरोबर २०११ मध्ये सौदामिनी फायनान्स ही कंपनी हडपसर येथील वैशाली हाईट्समध्ये सुरू केली़ त्याबरोबर या दोघांच्या सांगण्यावरून त्यांनी चीट फंडही सुरू केला़ चीट फंड व फायनान्स कंपनीसाठी त्यांनी नातेवाईक व इतरांकडून ठेवी घेतल्या होत्या़ त्यात जाधव, गोसावी व अन्य दोघांनी ६ ते ८ कोटी रुपयांचा घोटाळा करून ते पैसे दोघांनी स्वत:साठी वापरले़

Web Title: Pune: Commercial Suicide Case; Crime against two partners with two partners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.