पुणे : इयत्ता बारावीच्या निकालात पुणे विभागात पिछाडीवर पडलेल्या पुणे जिल्ह्याने दहावीच्या निकाल अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्ह्याचा निकाल ९७.९३ टक्के लागला असून एकुण १ लाख २२ हजार १७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सोलापुर जिल्ह्यातील ९७.५३ आणि अहमदनगर मधील ९६.१० टक्के विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाचा एकुण निकाल ९७.३४ टक्के इतका लागला आहे. विभागात एकुण २ लाख ५७ हजार ८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २ लाख ५० हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर १ लाख २ हजार २८२ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी व ९२ हजार ५८९ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे. विभागात पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक १ लाख २५ हजार १६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख २२ हजार १७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सोलापुर जिल्ह्यातील ६३ हजार १९३ विद्यार्थ्यांपैकी ६१ हजार ६३३ विद्यार्थी तर नगर जिल्ह्यातील ६९ हजार ५३ पैकी ६६ हजार ३६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्याच्या निकालाप्रमाणेत विभागातही मुलींनीच बाजी मारली आहे. परीक्षेला बसलेल्या एकुण १ लाख १६ हजार ४५२ मुलींपैकी १ लाख १८ हजार ४१९ मुली उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.३३ एवढी आहे. तर १ लाख ३३ हजार ७१६ मुले उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी ९६.४८ एवढी आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५९ हजार ६९७ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९८.६२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. -----------विभागनिहाय निकालजिल्हा परीक्षेला बसलेले उत्तीर्ण टक्केवारीपुणे १,२४,७८२ १,२२,१७५ ९७.९३अहमदनगर ६९,०५३ ६६,३६० ९६.१०सोलापूर ६३,१९३ ६१,६३३ ९७.५३------------------------------------------------------एकुण २,५७,००८ २५,०१६८ ९७.३४--------------------------------------------------------मुले व मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारीजिल्हा मुले मुलीपुणे ९७.२८ ९८.६२अहमदनगर ९४.९१ ९७.५९सोलापूर ९६.७२ ९८.५१-----------------------------------