महाप्रीत कडून पुणे महापालिका 2.82 रूपये किलो व्हॅटदराने वीज खरेदी करणार

By राजू हिंगे | Published: October 5, 2023 03:28 PM2023-10-05T15:28:44+5:302023-10-05T15:28:58+5:30

पुणे पालिकेकडून सन 2022 – 23 या आर्थिक वर्षात सुमारे 293 कोटी वीजखर्चापोटी तरतूद उपलब्ध करण्यात आली असून यापुढील काळात वीजखर्चात बचत करणेसाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे

Pune Municipal Corporation will purchase electricity from Mahapreet at the rate of Rs 2.82 per kilowatt | महाप्रीत कडून पुणे महापालिका 2.82 रूपये किलो व्हॅटदराने वीज खरेदी करणार

महाप्रीत कडून पुणे महापालिका 2.82 रूपये किलो व्हॅटदराने वीज खरेदी करणार

googlenewsNext

पुणे : महापालिकेकडे ओपन अॅक्सेसव्दारे पॉवर खरेदी करणे या प्रकल्पांतर्गत महाप्रीत या शासकीय संस्थेबरोबर करण्यात आले आहे. ज्यामध्ये 20 वर्षापर्यंत 3.40 किलो व्हॅट या दराने वीज खरेदी करण्यात येणार होते. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे. 25 वर्षापर्यंत 2.82 किलो व्हॅट दराने वीज खरेदी केली जाणार आहे. तसेच ओपन ॲक्सेसव्दारे वीज खरेदी करण्यासाठी महाप्रीत या शासकीय संस्थेसोबत एसपीव्ही स्थापित करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

महापालिका विद्युत विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. पुणे पालिकेकडून सन 2022 – 23 या आर्थिक वर्षात सुमारे 293 कोटी वीजखर्चापोटी तरतूद उपलब्ध करण्यात आली असून यापुढील काळात वीजखर्चात बचत करणेसाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत वीज खरेदी म.रा.वि.वि.कंपनीकडून केली जात असून अन्य वीज कंपनीकडून कमी दरात ओपन ॲक्सेसच्या द्वारे वीज खरेदी करणे फायद्याचे ठरणार आहे. यासाठी विद्युत विभागाने 1 एमडब्लयु पेक्षा जास्त वीज वापर असलेल्या वीज ग्राहकांची यादी तयार केली असून त्या ठिकाणी वापर होत असलेल्या वीज युनिट आणि त्यापोटी अदा करण्यात आलेल्या रक्कमेची माहिती सोबत देण्यात आलेली आहे. एसपीव्ही मध्ये आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि मुख्य अभियंता विघृत यांचा समावेश आहे, असे प्रस्तावात नमुद केले आहे.

Web Title: Pune Municipal Corporation will purchase electricity from Mahapreet at the rate of Rs 2.82 per kilowatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.