पुणे तिथे काय उणे! आता 'चक्क' एटीएममधून मिळणार म्हशीचे दूध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 08:00 PM2021-07-27T20:00:48+5:302021-07-27T20:06:01+5:30

प्रिपेड कार्डही व रोख पैसे देऊन मिळणार दूध; पुण्यातील दीप बंगला चौकात हे दुधाचे एटीएम सुरु

In Pune! Now you can get buffalo milk from ATM | पुणे तिथे काय उणे! आता 'चक्क' एटीएममधून मिळणार म्हशीचे दूध

पुणे तिथे काय उणे! आता 'चक्क' एटीएममधून मिळणार म्हशीचे दूध

googlenewsNext
ठळक मुद्देदहा रुपयापासून दूध मिळणारकिटली आणि पिशवी दोन्हीतुन दूध घेता येणार

पुणे : दूध हवे आहे का? फक्त १० रूपयांचेच पाहिजे का? मग दुधाच्या एटीएम मध्ये या. हवे तितक्याच पैशांचे दूध तूम्हाला मिळेल. दीप बंगला चौकात हे दुधाचे एटीएम सुरु झाले आहे. आनंद कुलकर्णी यांनी ही डेअरी सुरु केली आहे.

अनेकदा कमी गरज असूनही जास्त दुध घ्यावे लागते. आता ते महागले आहे. परवडत नाही. सकाळी आणले नाही की दुपारी मिळत नाही. पिशवीच घ्यावी लागते. अशा सर्व अडचणींवर हे दुधाचे एटीएम मात करते. एकदाच पैसे भरून तूम्ही तूम्हाला हवे तेवढ्या पैशांचे दूध घेऊ शकता. अगदी १० रूपयांचेही दूध मिळेल. तूम्ही किटली आणली असेल तर किटलीतही मिळेल. पिशवी हवी असेल तर तीपण आहे. सकाळीच यायचे बंधन नाही. दिवसभरात कधीही ते मिळेल.

शास्त्रीय पद्धतीने थंड केलेले, पुर्ण शुद्ध, मानवी हातांचा स्पर्शही न होणारे असे दूध या एटीएममधून मिळेल.
कुलकर्णी यांनी सांगितले की एकावेळी १०० लिटरची याची क्षमता आहे. त्याशिवाय आणखी १०० लिटर तयार ठेवता येते. हवे तेवढ्याच पैशांचे दूध कोणाही सर्वसामान्य कुटुंबालाही घेता यावे या ऊद्देशातून हे एटीएम सुरु केले आहे. एका कंपनीकडून हव्या असलेल्या गरजेनूसार मशिन तयार करून घेतले अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: In Pune! Now you can get buffalo milk from ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.