Pune Police: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 09:24 AM2024-01-17T09:24:39+5:302024-01-17T09:25:00+5:30

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस दलातील २३ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार ...

Pune Police: Internal transfers of 23 police inspectors in view of Lok Sabha elections | Pune Police: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Pune Police: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणेपोलिस दलातील २३ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.

पोलिस निरीक्षकांसह पोलिस दलातील १९ सहायक पोलिस निरीक्षक आणि ७६ पोलिस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी शहरातील १२ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार बदल्या केल्या आहेत. यात नरेंद्र मोरे (प्रशासन ते लष्कर पोलिस ठाणे), संदीपान पवार (वाहतूक शाखा ते बंडगार्डन पोलिस ठाणे), किरण बालवाडकर (उत्तमनगर पोलिस ठाणे ते पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्ष), दीपाली भुजबळ (गुन्हे शाखा ते उत्तमनगर पोलिस ठाणे), नीलिमा पवार (बंडगार्डन पोलिस ठाणे ते वाहतूक शाखा), सुनील झावरे (स्वारगेट पोलिस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा), सुरेशसिंग गौड (मार्केट यार्ड पोलिस ठाणे ते स्वारगेट ठाणे), अरविंद माने (शिवाजीनगर पोलिस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा), चंद्रशेखर सावंत (सायबर गु्न्हे शाखा ते शिवाजीनगर पोलिस ठाणे), जयराम पायगुडे (पर्वती पोलिस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा), नंदकुमार गायकवाड (दरोडा आणि वाहनचोरी प्रतिबंध दोन ते पर्वती पोलिस ठाणे), राजेंद्र लांडगे (चंदननगर पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष), मनीषा पाटील (चंदननगर पोलिस ठाणे, वरिष्ठ निरीक्षक), सविता ढमढेरे (बिबवेवाडी पोलिस ठाणे ते विशेष शाखा), स्वप्नाली शिंदे (मार्केट यार्ड पोलिस ठाणे ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक), विनय पाटणकर (वानवडी पोलिस ठाणे ते बिबवेवाडी पोलिस ठाणे), गणेश उगले (आर्थिक गुन्हे शाखा ते पोलिस निरीक्षक कल्याण), संदीप भोसले (कोंढवा पोलिस ठाणे ते सायबर गुन्हे शाखा), दादा गायकवाड (विश्रामबाग पोलिस ठाणे ते वाहतूक शाखा), विजय खोमणे (पर्वती पाेलिस ठाणे ते सायबर गुन्हे शाखा), अजय वाघमारे (खंडणीविरोधी पथक एक ते वाहनचोरी प्रतिबंधक पथक दोन), रजनीश निर्मल (आर्थिक गुन्हे शाखा ते गुन्हे शाखा, प्रशासन), गणेश माने (आर्थिक गुन्हे शाखा ते गुन्हे शाखा).

Web Title: Pune Police: Internal transfers of 23 police inspectors in view of Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.