Pune Police: पुणे पोलिसांची मान शरमेने खाली; तीन पोलिसांचा मद्यधुंद अवस्थेत हॉटेलात धिंगाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 08:22 PM2022-11-22T20:22:13+5:302022-11-22T20:22:33+5:30

सोमवारी मध्यरात्री मुंढवा परिसरातील मेट्रो हॉटेलमध्ये हा प्रकार घडला

Pune Police neck is down in shame Three policemen rioted in a hotel in a drunken state | Pune Police: पुणे पोलिसांची मान शरमेने खाली; तीन पोलिसांचा मद्यधुंद अवस्थेत हॉटेलात धिंगाणा

Pune Police: पुणे पोलिसांची मान शरमेने खाली; तीन पोलिसांचा मद्यधुंद अवस्थेत हॉटेलात धिंगाणा

googlenewsNext

पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : पुणेपोलिसांची मान शरमेने खाली जाईल असे कृत्य पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी केले आहे. मुंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये दारूच्या नशेत या तीन पोलीस कर्मचार्‍यांनी भयंकर राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दारू पिल्यानंतर आणखी दारूची मागणी करून न देणाऱ्या मॅनेजरला या तिघांनी मारहाण केली. सोमवारी मध्यरात्री मुंढवा परिसरातील मेट्रो हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस अंमलदार उमेश मरीस्वामी मठपती (२९, रा. सोमवार पेठ), अमित सुरेश जाधव ( ३७,  रा. भवानी पेठ) आणि योगेश भगवान गायकवाड (३२, रा. केशवनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हॉटेल मॅनेजर कुनाल दशरथ मद्रे (२७, रा. घोरपडीगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
 मुंढवा पोलीस ठाण्यात मारहाण तसेच मुंबई दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी मद्रे हे मेट्रो लाऊंज हॉटेलमध्ये मॅनेजर आहेत. सोमवारी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करण्याच्या तयारीत होते. यावेळी पोलिस अंमलदार उमेश मठपती, अमित जाधव आणि योगेश गायकवाड हॉटेलमध्ये आले. त्यांनी बार काऊन्टरवर मद्य प्राशन केले. यानंतर आणखी दारूची मागणी केली. तसेच, शिवीगाळ करीत येथील रोहित काटकर याला हाताने मारहाण केली. एवढेच नाही तर मोठमोठ्या आवाजात धमकी देऊन हॉटेलमधील बार काऊंटरवर धिंगाणा घातला. 

या सर्व प्रकाराची माहिती मुलगा पोलिसांना समजतात पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर या तीनही कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मठपती हे फरासखाना पोलीस ठाण्यात, जाधव हे समर्थ वाहतूक विभाग आणि गायकवाड हे चंदननगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत.

Web Title: Pune Police neck is down in shame Three policemen rioted in a hotel in a drunken state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.