मुलांसाठी पुणे पोलिसांची ‘पोलीस काका’ योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:22 PM2018-12-24T12:22:35+5:302018-12-24T12:27:35+5:30
गुन्हे जर कमी करायची असेल तर त्यासाठी लहान वयातील मुलांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
पुणे : ज्यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिर्नींना शालेय जीवनात काही अडचण निर्माण झाल्यास त्यांना इतरांना ती अडचण सांगता येत नाही किंवा अडचण सांगण्यास संकोच वाटतो या विध्यार्थ्यांकरीता पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सुरु केलेल्या ‘पोलीस काका’ ही योजनेची सुरु केली आहे. या योजनेची विस्तृत माहिती दिली.
पुणे शहरातील गुन्हेगारी कमी करुन शहरात शांतता नांदावी या करीता पुणे शहर पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांचे मोठया प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. या अंतर्गत पूर्वी गुन्हे केलेल्या व न्यायालयातून जामीनावर बाहेर आलेल्या आरोपींवर वेळोवेळी नजर ठेवुन त्यांच्या चालु कारवाया, सध्या ते काय आहेत याचे मॉनीटरींग पोलिसांच्या वतीने चालु आहे. तसेच ज्या भागात गुन्हे वारंवार घडतात त्या भागात पोलीसांचे ‘व्हिज्युअल पोलिसींग’ चालु असुन त्या अंतर्गत स्थानिक नागरिकांशी संपर्क साधुन एखादी घटना घडण्यापूर्वी त्याची माहिती पोलिसांना द्यावी यासाठी नागरिक गट तयार करुन त्यामध्ये पोलीस प्रतिनिधी काम करत आहे.
ज्या भागामध्ये शाळा आहे. तेथील पोलीस काकांची विद्याथ्यांना ओळख करुन दिली व त्यांचे मोबाईल नंबर दिले, तसेच शालेय मुलींना शाळेच्या बाहेर किंवा अंतर्गत भागात काही त्रास असल्यास त्यांनी नि:संकोचपणे महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे आपली तक्रार सांगावी ज्यामध्ये स्कुल बस चालक,रस्त्यावरील टारगट मुले किंवा समाजातील इतर वाईट प्रवृत्तींकडून होणाऱ्या त्रासाचा समावेश होतो.
गुन्हे जर कमी करायची असेल तर त्यासाठी लहान वयातील मुलांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना त्या क्षेत्राकडे वळू नये या करीता त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. प्रबोधनाकरीता शाळेपेक्षा दुसरी योग्य जागा मिळणे अशक्य आहे. याच संधीचा उपयोग करण्याचे दत्तवाडी पोलिसांनी ठरविले. त्यानुसार सध्या शालेय विश्वामध्ये स्नेह संमेलनाचे वारे मोठया प्रमाणात वाहू लागलेले आहे.
या स्नेह संमेलनामध्ये आपल्या मुलांचे कला गुणांचे कौतुक करण्यासाठी पालक सुद्धा आवर्जून वेळ काढून उपस्थित राहतात . याचे औचित्य साधुन मुलांमध्ये आणि पालकामध्ये प्रबोधन करण्यासाठी रावसाहेब पटवर्धन हायस्कुल सिंहगड रोड व अरण्येश्वर इंग्लिश मिडियम स्कुल सहकारनगर या शाळेमध्ये स्नेह संम्मेलनाच्या वेळेत दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोनि गुन्हे कृष्णा इंदलकर, पोलीस उप निरीक्षक विकास जाधव , रुपाली कुलथे , सहा. पोलीस फौजदार रमेश मुजुमले, पोलीस हवालदार श्रीकांत शिरोळे , प्रविण जगताप ,साधना ताम्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल साळुखे, रोहन खैरे असे उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला .विद्यार्थ्यांना शाळे मध्ये घेवुन येणारी व घरी नेवुन सोडणारी स्कुल बस किंवा रिक्षा यामध्ये किती विद्यार्थी असावेत. लहान मुलांना दुचाकी चालविण्याचे लायसन नसताना काही पालक अति प्रेमापोटी वाहन चालवायला देतात. त्यांनी आपल्या मुलांच्या भवितव्य ओळखून दुचाकी वाहने लायसन नसताना देवु नये. दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे किती आवश्यक आहे.
याचे उदाहरणासह विश्लेषण या कार्यक्रमात केले. रावसाहेब पटवर्धन हायस्कुलचे वर्षा गुप्ते, शिवाजी खांडेकर, मुख्याध्यापिका हजारे मॅडम, अरण्येश्वर इंग्लिश मिडियम स्कुलचे बाळासाहेब ढुमे यांनी विशेष सहकार्य केले व पोलीस राबवत असलेल्या कम्युनिटी पोलिसींग या संकल्पनेचे स्वागत केले. यापुढे असे कार्यक्रम वेळोवेळी शालेय स्तरावर राबवावेत असे आपले मनोगत व्यक्त केले.