पुणे : पुण्यात आता उन्हाळ्याचा कडाका मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला असून लोहगाव येथील कमाल तापमानाने चाळीशीचा आकडा पार केला आहे. त्याचवेळी पुणे शहरात रात्रीच्या वेळी अजूनही हलका गारवा जाणवत आहे.
राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४३.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. त्याचवेळी सर्वात कमी किमान तापमान पुण्यात १८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. दरम्यान, विदर्भात मंगळवारी काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कोकण, गोव्याच्या तुरळक भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून विदर्भाच्या बहुतांश भागात व मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली आहे. मराठवाड्यातील बर्याच भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे ३९.३, लोहगाव ४०.१, जळगाव ४१.५, कोल्हापूर ३९.५, महाबळेश्वर ३२.९, मालेगाव ४२, नाशिक ३९.१, सांगली ३९.८, सातारा ३८.९, सोलापूर ४१.५, मुंबई ३३.३, सांताक्रुझ ३४.६, अलिबाग ३१.४, रत्नागिरी ३३.३, पणजी ३३.९, डहाणु ३१.५, औरंगाबाद ३९.७, परभणी ४१.१, अकोला ४२.८, अमरावती ४१.८, बुलढाणा ४०, ब्रम्हपूरी ४३.३, चंद्रपूर ४२.८, गोंदिया ४०.८, नागपूर ४१.५, वर्धा ४२़