पुणे : खूनप्रकरणी महिलेला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 05:32 AM2018-02-26T05:32:14+5:302018-02-26T05:32:14+5:30
लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून सिमेंटची वीट डोक्यात घालून प्रियकराचा खून करणाºया महिला आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई न्यायालयाने जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
पुणे : लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून सिमेंटची वीट डोक्यात घालून प्रियकराचा खून करणाºया महिला आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई न्यायालयाने जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही रक्कम भरली नाही तर अधिक एक महिन्याचा कारावास भोगण्याच्या शिक्षेची तरतूद न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आली आहे.
सरिता राजेंद्र सपाटे ऊर्फ सरिता अनिल सपाटे (वय २५, रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, म्हेत्रेवस्ती, चिखली, ता. हवेली, जि. पुणे) हिला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही घटना ६ मार्च २०१४ रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास शिवाजीनगर येथील आकाशवाणी केंद्राजवळील फुटपाथवर घडली होती. या घटनेत हनुमंता मारुती घोडके (रा.शिवाजीनगर) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांचे बंधू शिवाजी मारुती घोडके यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. ज्ञानेश्वर लक्ष्मण राणे (वय २०, रा. झेंडे चौक, मोरे वस्ती, चिखली, ता. हवेली मूळगाव- जळगाव) व अस्लम बसीर मुजावर (वय २०, रा. सानेकॉलनी, मोरेवस्ती, चिखली ता. हवेली, मूळगाव-परांडा जि. उस्मानाबाद) यांना सढळ पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्त केले.