पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणाची दगडानं ठेचून निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 10:45 AM2018-08-06T10:45:03+5:302018-08-06T10:50:11+5:30
दौंड येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची दगडानं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
केडगाव ( पुणे ) - दौंड येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची दगडानं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळू व गुंडगिरीतून उद्भवलेल्या वादातून स्वप्नील शेलार (वय 28 वर्ष)याची हत्या करण्यात आली आहे. रविवार (5 ऑगस्ट) रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आखाड पार्टीनिमित्त स्वप्निल शेलारच्या घरी जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संध्याकाळच्या सुमारास जेवणाचा डबा देण्यासाठी स्वप्नील बाईकवरुन घरापासून 200 मीटर अंतरावर असणाऱ्या एकेरीवाडी -देलवडी रस्त्यावर नारायण शेलार यांच्या घरासमोर पोहोचला.
याचदरम्यान, अज्ञात व्यक्तींनी स्वप्नीलवर धारदार शस्राने वार केला. तसेच डोक्यामध्ये मोठा दगडदेखील घातला. या घटनेत स्वप्नीलच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. पोलिसांनी याबाबतची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाहून एक गावठी कट्टादेखील जप्त केला आहे. याप्रकरणी स्वप्नीलचा भाऊ विशाल शेलारनं यवत पोलिसात तक्रार दाखल केली असून काही संशयित आरोपींची नावं समोर आली आहेत.