पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाले भाज्यांची आवक वाढल्याने कोथिंबीर व मेथीच्या दरात घट झाली आहे.तर उर्वरित भाज्यांचे दर स्थिर आहेत. कोथिंबिरीच्या शेकडा जुडीला ३०० ते ६०० आणि मेथीला ४०० ते ६०० रुपये दर मिळाला.
दुष्काळी स्थिती असली तरी जिल्ह्यात पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. त्यामुळे सर्वच पालेभाज्यांचे दर उतरले आहेत. तर कांदा, गवार, बटाटा, लसूण, वांगी, हिरवी मिरची इ. भाज्यांचे दर स्थिर आहेत. कांद्याला एका क्विंटलला ७०० ते १६०० रुपये दर मिळाला तर बटाट्याला १३०० ते २००० भाव मिळाला. भेंडीला १००० ते ३००० हजार तर हिरव्या मिरचीला १००० ते २००० रुपये दर मिळाला. गेल्या आठवड्याप्रमाणे टॉमेटोचे दर घसरलेलेच आहेत. टॉमेटोला २०० ते ६०० रुपये दर मिळाला, असे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिका-यांनी सांगितले.