शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात दोन नाट्यगृहांची भर; कोथरूड, येरवड्यात नव्या वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:04 PM

कोथरूड येथील बाळासाहेब ठाकरे कलामंदिर आणि येरवड्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह या दोन वास्तूंच्या रूपाने पुण्याचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होणार आहे.

ठळक मुद्दे७०० आसनक्षमता असलेल्या अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे काम पूर्ण पुढील सहा महिन्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे कलामंदिर रसिकांसाठी होणार खुले

पुणे : नाट्य, कला, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा जपणाऱ्या पुणे शहरातील रसिकांना नव्या वर्षात दोन नवीन नाट्यगृहांची अनोखी भेट मिळणार आहे. कोथरूड येथील बाळासाहेब ठाकरे कलामंदिर आणि येरवड्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह या दोन वास्तूंच्या रूपाने पुण्याचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होणार आहे. याचवेळी उपनगरांमधील ओस पडणाऱ्या नाट्यगृहांबाबत महानगरपालिकेतर्फे ठोस तोडगा काढण्यात येणार आहे.सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या वैभवात या दोन नाट्यगृहांच्या निमित्ताने भर पडणार आहे. येरवडा येथील गुंजन चित्रपटगृह परिसरात सुमारे ७०० आसनक्षमता असलेल्या अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, लिफ्टचे काम अपूर्ण आहे. नाट्यगृहासाठी आवश्यक सोयीसुविधा आणि कार्यालयीन कामकाजाची व्यवस्था यासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतर काम पूर्णत्वाकडे जाणार आहे.

कोथरूड येथील बाळासाहेब ठाकरे कलामंदिरात ग्रीन रूम, बुकिंग आॅफिस, मेकअप रूम, रंगीत तालमीसाठी छोटा हॉल, उपाहारगृह, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. कलामंदिरातील वातानुकूलित यंत्रणा, नाट्यगृहातील खुर्च्या आणि अंतर्गत सजावटीची कामे पूर्ण होण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागेल. पहिल्या मजल्यावर बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे, दुर्मीळ छायाचित्रे, त्यांच्या भाषणांच्या सीडी असे स्वरूप असलेले छोटेखानी कलादालन उभे राहणार आहे. नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी या कलामंदिरासाठी पाठपुरावा केल्याची माहिती महानगरपालिकेचे रंगमंदिर प्रमुख प्रकाश आमराळे यांनी दिली.

सध्या १३ सभागृहे पुणे महानगरपालिकेतर्फे सध्या बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रीडा मंच, पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अण्णा भाऊ साठे नाट्यगृह (पद्मावती), सावित्रीबाई फुले सभागृह, भारतरत्न पं. भीमसेन जोशी नाट्यगृह, महात्मा फुले सभागृह, पं. भीमसेन जोशी कलादालन, विजय तेंडुलकर नाट्यगृह, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे कलादालन, मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अशा १३ सभागृह आणि कलादालनांचा समावेश आहे.यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आवारात तीन हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्यात आले आहे. यापैकी दीड हजार चौरस फूट जागेमध्ये छोटेखानी नाट्यगृह उभारण्यात येत आहे. यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोथरूडमध्ये ३८४ आसनक्षमता असलेले छोटेखानी नाट्यगृह आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे कायमस्वरूपी दालन अशी रचना केली जात असून, बाळासाहेब ठाकरे कलामंदिराचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये हे कलामंदिर रसिकांसाठी खुले होणार आहे. 

टॅग्स :kothrudकोथरूडYerwadaयेरवडाPuneपुणे